Lawyer Dies of Heart Attack While Arguing: तेलंगणा उच्च न्यायालयात घडली दुःखद घटना, खटल्याचा युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

तेलंगणा उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये मंगळवारी युक्तिवाद करताना एका वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वेणुगोपाल राव (66 वर्ष) आहे.राव दुपारी 1.20 च्या सुमारास न्यायमूर्ती लक्ष्मी नारायणा अलीशेट्टी यांच्यासमोर कोर्ट हॉल 21 मध्ये सबमिशन देत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले.

Court

Lawyer Dies of Heart Attack While Arguing : =  तेलंगणा उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये मंगळवारी  युक्तिवाद करताना एका वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वेणुगोपाल राव (66 वर्ष) आहे.राव दुपारी 1.20 च्या सुमारास न्यायमूर्ती लक्ष्मी नारायणा अलीशेट्टी यांच्यासमोर कोर्ट हॉल 21 मध्ये सबमिशन देत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले. वृत्तानुसार, यानंतर, सहकारी वकील आणि न्यायालयीन कर्मचारी राव यांच्या मदती ला धावले आणि वकिलांनी सीपीआर दिले. त्यानंतर त्यांना तातडीने उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. राव यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे. राव हे 1998 पासून हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते. 

येथे पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement