NASA Layoffs: अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये कामगार कपात; 10% कर्मचाऱ्यांना दिला नारळ

अमेरिकन अंतराळ संस्था नासामधील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

NASA (PC - pixabay)

NASA Layoffs: अमेरिकन अंतराळ संस्था नासा (National Aeronautics and Space Administration) मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे (Layoffs 2025) वृत्त समोर आले आहे. घडामोडी घडत असताना शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. नासाच्या (NASA) सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी एबीसी न्यूजला ही माहिती दिला. त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, “नासा ओपीएमने दिलेल्या मार्गदर्शनाचे आणि निर्देशांचे पालन करत आहे. आमच्या एजन्सीच्या परिणामांवर चर्चा करणे सध्या अकाली आहे.”

दरम्यान गेल्या वर्षी 2024 मध्ये नासाने कर्मचारी कपात केली होती. नोव्हेंबर 2024मध्ये 400 कर्मचाऱ्यांनी कामावरून काढले होते.

अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये कामगार कपात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now