ठळक बातम्या

Chaava Box Office Collection Week 1: छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली शानदार कामगिरी, पहिल्याच आठवड्यात केली 225.28 कोटींची कमाई

Shreya Varke

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशल स्टारर 'छवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. गुरुवारी ₹21 .60 कोटी कमावून एकूणच, चित्रपटाने आतापर्यंत 225.28 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'छावा' ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात त्यांचे संघर्ष, शौर्य आणि त्यागाचे चित्रण करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana: राज्यातील 9 लाख महिला 'लाडकी बहिण योजने'साठी अपात्र; इथूनपुढे मिळणार नाहीत 1,500 रुपये

Prashant Joshi

आर्थिक निकषांच्या आधारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आता त्यात आणखी 4 लाख महिलांचा समावेश होणार आहे. यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचतील असे सांगितले जात आहे.

India's Got Latent प्रकरणी Rakhi Sawant ची चौकशी होणार; महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्रीला बजावले समन्स

Bhakti Aghav

राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने 27 फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

Farah Khan’s Holi Remark Sparks Controversy: फराह खान सोशल मीडियावर ट्रोल, होळीला म्हटले छापरी लोकांचा आवडता सण, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ

Shreya Varke

चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानने होळीला 'छापरी लोकांचा आवडता सण' असे म्हंटल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर फराहचे विधान अपमानजनक आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी फराह खानवर जोरदार टीका केली आहे. शोमध्ये, ती स्पर्धक गौरव खन्ना सोबत बोलत असताना, तिने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, "होळी हा सर्व छपरी लोकांचा आवडता सण आहे."

Advertisement

Amit Shah Pune Visit: उद्या गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उद्या (22 फेब्रुवारी) पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विभागीय परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Threat to Bomb Eknath Shinde's Car: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना अटक

Shreya Varke

बुलढाणा येथून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या ईमेल प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. मंगेश अच्युतराव वाया (३५) आणि अभय गजानन शिंगणे वाया (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 351(3), 351(4) आणि 353(2) अंतर्गत तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Videos Of Women Bathing Maha Kumbh: महाकुंभात महिलांच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवणाऱ्या 103 सोशल मीडिया हँडलवर कारवाई

Bhakti Aghav

महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे गुप्त व्हिडिओ बनवून ते डार्क वेब (पोर्नोग्राफिक साइट) आणि इतर सोशल मीडियावर विकणाऱ्यांविरुद्ध प्रयागराज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात प्रयागराज पोलिसांनी 13 एफआयआर दाखल केले आहेत.

Hathras Stampede Case: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात 'Bhole Baba' ला मिळाली क्लीन चिट, आयोजकांना ठरवले जबाबदार, झाला होता 121 लोकांचा मृत्यू

Prashant Joshi

हाथरस घटनेच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला आणि तो सभागृहात मांडण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

Advertisement

Shehnaaz Gill Hot Photos: बिग बॉस फेम शहनाज गिलला चाहत्यांनी केले ट्रोल, येथे पाहा, काय आहे कारण

Shreya Varke

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बिग बॉस फेम शहनाज गिल सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ती सतत तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, तिने काळ्या मोनोकिनी आणि डेनिम शॉर्ट्समधील काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती बोंडी बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. एकीकडे तिच्या चाहत्यांना तिचा लूक आवडला, तर दुसरीकडे काही लोकांनी तिच्या ड्रेसवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

Vada Pav To Become Costlier? मुंबईमधील रेस्टॉरंट्स, ढाबे आणि बेकरींना हरित इंधनाचा वापर करण्याचे BMC चे आदेश; 'वडापाव' सारख्या स्ट्रीट फूड्सच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता

Prashant Joshi

मुंबई बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष (दक्षिण मुंबई) अशफाक सिद्दीक यांच्यानुसार, स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक केल्याने, सहा पावची किंमत 12 रुपयांवरून 60 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पाव तयार करण्यासाठी सध्याच्या ओव्हनमध्ये डिझेल आणि लाकडाचा वापर केला जात आहे. जर त्याऐवजी विजेचा वापर केल्यास उत्पादनाचा मूळ खर्च वाढेल.

Google Pay Convenience Fees: गुगल पेचा ग्राहकांना मोठा झटका! मोफत पेमेंटची सुविधा बंद, 'अशा' व्यवहारांवर आकारले जाणार ज्यादा शुल्क

Prashant Joshi

जर प्रक्रिया शुल्क लागू असेल, तर पेमेंट करताना तुम्हाला ते कोणत्याही बिलाच्या रकमेसह दिसेल. तुम्ही गुगल पे अ‍ॅपच्या पेमेंट हिस्टरीमध्ये प्रक्रिया शुल्क देखील पाहू शकता. त्यामध्ये बिलाच्या रकमेसह आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क सूचीबद्ध आहे. जर तुमचे बिल भरणे अयशस्वी झाले, तर प्रक्रिया शुल्कासह संपूर्ण बिल रक्कम

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोठी भेट, राज्यात मुली आणि बहिणींना रेशन कार्डवर मोफत मिळणार साड्या

Shreya Varke

सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पात्र रेशन कार्डधारक बहिणींना दुकानात धान्यासह मोफत साडी देण्याची घोषणा केली आहे. या साड्या उत्सवाच्या दिवशी वाटल्या जातील. हा उपक्रम वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविला जाईल. याचा फायदा पुणे जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार ८७४ रेशनकार्डधारकांना म्हणजेच महिलांना होईल.

Advertisement

Kash Patel Becomes New FBI Director: भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती; मानले जातात Donald Trump यांचे निकटवर्ती सहकारी

Prashant Joshi

काश पटेल यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1980 रोजी न्यूयॉर्कमधील गार्डन सिटी येथे भारतीय गुजराती स्थलांतरित पालकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे पालक पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथून स्थलांतरित झाले होते. पटेल हे एक अमेरिकन वकील आणि सरकारी अधिकारी आहेत.

98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु; PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

टीम लेटेस्टली

या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट मराठी साहित्याचा प्रसार, संवर्धन, आणि विकास करणे आहे. दरवर्षी, हे संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाते, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील साहित्यिक आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार Sourav Ganguly चा दुर्गापूर महामार्गावर कार अपघात

Shreya Varke

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा काल रात्री उशिरा दुर्गापूर एक्सप्रेसवेवर दंतनपूरजवळ वर्धमानला जात असताना किरकोळ अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या कारचे थोडे नुकसान झाले पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, सौरव एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमानला जात असताना हा अपघात झाला.

Shubman Gill New Record: शुभमन गिलने एका झटक्यात मोडला शिखर धवनचा विक्रम, एकदिवसीय सामन्यात केली अद्भुत कामगिरी

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो शुभमन गिल होता. तो शतकी खेळी करुन नाबाद परतला.

Advertisement

IND Beat BAN 2nd Match Scorecard: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने फोडला विजयाचा 'नारळ', बांगलादेशचा 6 विकेटने केला पराभव; गिलचे शानदार शतक

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला.

Best Luck Messages For SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी खास Messages, Wishes, Quotes द्वारे शुभेच्छा देऊन वाढवा विद्यार्थ्याचं मनोबल!

टीम लेटेस्टली

आम्ही तुमच्यासाठी दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खास Messages, Wishes, Quotes द्वारे शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंग्ज घेऊन आलो आहोत. तुम्ही या शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवू शकता.

Shubman Gill Century: शुभमन गिलचे शानदार शतक, भारत विजयाच्या जवळ

Nitin Kurhe

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला स्टार शुभमन गिलने शानदार शतक झळकावले आहे.

Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय

Nitin Kurhe

रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी 261 डाव ​​घेतले, विराट कोहलीनंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने फक्त 222 डावांमध्ये 11,000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. रोहितने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने हा पराक्रम करण्यासाठी 276 डाव खेळले.

Advertisement
Advertisement