Amit Shah Pune Visit: उद्या गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल, जाणून घ्या सविस्तर

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उद्या (22 फेब्रुवारी) पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विभागीय परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Amit Shah | X @ANI

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उद्या (22 फेब्रुवारी) पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विभागीय परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदही ते भूषवतील. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल आणि निर्बंधांची सूचना दिली आहे.

अधिसूचनेनुसार, पाषाण रोड, बाणेर रोड आणि औंध रोडवर संपूर्ण दिवस जड वाहनांना बंदी असेल. शिवाय, पुणे शहरात संथ गतीने चालणाऱ्या, अति जड वाहनांवर पूर्ण दिवस बंदी लागू केली जाईल.

हिंजवडी वाहतूक विभागाअंतर्गत, खालील बदल लागू केले जातील:

चांदे, नांदे आणि महाळुंगे येथून राधा चौकजडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर जड वाहनांची वाहतूक थांबवली जाईल. त्यांना गोदरेज चौक आणि हिंजवडी मार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, सुस ब्रिज आणि न्याती शोरूमकडून येणारी जड वाहने मुंबई-बंगळुरू महामार्ग आणि हिंजवडी मार्गे वळवण्यात येतील.

अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, बालेवाडी स्टेडियमसमोरील रस्ता शीतलाई देवी चौक ते महाळुंगे पोलीस चौकी दरम्यानच्या सर्व वाहनांसाठी बंद राहील. बालेवाडी येथे कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त राधा चौक ते मुळा नदी पुलादरम्यानची वाहतूक बंद असेल.

बाणेर वाहतूक विभागाअंतर्गत, खालील बदल लागू केले जातील:

बाणेर रोड मार्गे राधा चौकात जाणारी वाहने किआ शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपासने वळवली जातील. (हेही वाचा: Pune Shivajinagar To Hinjawadi Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण, लवकरच होणार ट्रायल आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा सुरू)

हायवे बायपास रस्त्यावरून बाणेर रोडकडे येणारी वाहने बालेवाडी जकात नाका आणि बालेवाडी हाय स्ट्रीटने वळवली जातील.

हिंजवडी, वाकड, लोणावळा आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पाषाण रोड किंवा औंध रोडने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासह वानवडीमध्ये, टर्फ क्लब ते वॉटर टँक सर्कल दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरू केली जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now