भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार Sourav Ganguly चा दुर्गापूर महामार्गावर कार अपघात

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा काल रात्री उशिरा दुर्गापूर एक्सप्रेसवेवर दंतनपूरजवळ वर्धमानला जात असताना किरकोळ अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या कारचे थोडे नुकसान झाले पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, सौरव एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमानला जात असताना हा अपघात झाला.

Sourav Ganguly (Photo Credit - Twitter)

Sourav Ganguly met with a Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा काल रात्री उशिरा दुर्गापूर एक्सप्रेसवेवर दंतनपूरजवळ वर्धमानला जात असताना किरकोळ अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या कारचे थोडे नुकसान झाले पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, सौरव एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमानला जात असताना हा अपघात झाला. गांगुलीची रेंज रोव्हर सामान्य वेगाने जात असताना अचानक एका लॉरी ओव्हर टेक करत असतांना  गांगुलीच्या  रेंज रोव्हरचे नियंत्रण सुटले.परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात, त्याच्या ड्रायव्हरने ताबडतोब ब्रेक लावले, परंतु यामुळे ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली.

सौरवच्या गाडीच्या मागून येणारी कार त्याच्या रेंज रोव्हरला धडकली. सुदैवाने, वाहने जास्त वेगाने जात नसल्याने, कोणतीही दुखापत झाली नाही. तथापि, ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement