’s Holi Remark Sparks Controversy: चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानने होळीला 'छापरी लोकांचा आवडता सण' असे म्हंटल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर फराहचे विधान अपमानजनक आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी फराह खानवर जोरदार टीका केली आहे. शोमध्ये, ती स्पर्धक गौरव खन्ना सोबत बोलत असताना, तिने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, "होळी हा सर्व छपरी लोकांचा आवडता सण आहे." या विधानानंतर फराहला ट्रोलचा सामना करावा लागला, जिथे अनेकांनी ते "लज्जास्पद" आणि "भारतीय संस्कृतीचा अपमान" असे म्हटले.
येथे पाहा, फराह खानचा व्हायरल व्हिडीओ
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चे इतर स्पर्धक या शोमध्ये उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, राजीव अदातिया, निक्की तांबोळी आणि फैसल शेख सारखे सेलिब्रिटी स्पर्धक दिसत आहेत. हा कार्यक्रम दररोज रात्री ८ वाजता सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर प्रसारित होतो.फराह खानने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही या वादावर फराह खानने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.