ठळक बातम्या
Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव
Prashant Joshiसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जनतेचा वाढता रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला.
AUS vs IND 2025, Dubai Cricket Stadium Pitch and Weather Report: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यत येईल? दुबई क्रिकेट स्टेडियमचे हवामान आणि खेळपट्टीची कशी असेल? जाणून घ्या
Jyoti Kadamदुबईमध्ये पावसाची शक्यता नाही. ज्याचा मोठा दिलासा क्रिकेट चाहत्यांना आणि खेळाडूंना आहे. हवामान अंदाजानुसार, मंगळवारी दुपारी तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस राहील.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्यात मटका, जुगार अशा व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.
Madras High Court: अपघाताच्या वेळी ड्रायव्हर मद्यधुंद असला तरी विमा कंपनीला द्यावी लागणार नुकसान भरपाई- मद्रास उच्च न्यायालय
Shreya Varkeअपघातग्रस्त वाहनाचा चालक त्यावेळी दारूच्या नशेत असला तरी विमा कंपनी मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल. या खटल्यात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. धंडापाणी यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने दिलेल्या भरपाईत वाढ करण्यासाठी अपीलकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
Dhananjay Munde To Resign? धनंजय मुंडे होऊ शकतात पदावरून पायउतार; संतोष देशमुख हत्येप्रकरणी CM Devendra Fadnavis यांनी मागितला मंत्रीपदाचा राजीनामा- Reports
Prashant Joshiसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.
Zohra Jabeen Teaser: अभिनेता सलमान खानच्या सिकंदर या आगामी चित्रपटाचे गाणे आज होणार प्रदर्शित
Shreya Varkeसलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटातील 'जोहरा जबीं' हे गाणे आज प्रदर्शित होणार आहे, ज्याची माहिती टीझरद्वारे शेअर केली आहे. सलमान खानने सोशल मीडियावर टीझर शेअर केला आणि लिहिले की, 'जोहरा जबीं' गाणे आज रिलीज होईल. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि सलमान खानच्या स्टार पॉवरसह, 'सिकंदर' 2025 च्या ईदला प्रदर्शित होईल.
IND vs AUS, Champions Trophy 2025 Semi-Final Match Prediction: फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा सामना
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना आज दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यास त्यांची धावसंख्या 260-270 पर्यंत जाऊ शकते.
Sangli Shocker: एक कोटी रुपयांच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी पत्नीने मुलासह केली पतीची हत्या; पोलिसांकडून अटक
Prashant Joshiआरोपी महिलेने सांगितले की, तिचा नवरा कर्जात बुडाला होता. त्याच्यावर एकूण 50 लाख रुपयांचे कर्ज होते आणि त्या दबावामुळे ती आधीच त्रस्त होती. तिच्या पतीने 1 कोटी रुपयांचा विमा काढला असल्याने, त्यांनी प्रथम पतीला आत्महत्या करण्यास सांगितले. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले.
Dolly Parton’s Husband Carl Dean Passes Away: गायिका डॉली पार्टन यांचे पती कार्ल डीन यांचे 82 व्या वर्षी निधन
Shreya Varkeप्रसिद्ध गायिका डॉली पार्टनच्या पतीचे निधन झाले आहे. पती कार्ल डीन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी 3 मार्च रोजी नॅशव्हिल येथे निधन झाले. सहा दशकांहून अधिक काळ सहवास असलेल्या या जोडप्याने त्यांचे नाते मोठ्या प्रमाणात खाजगी ठेवले होते. "कार्ल आणि मी अनेक वर्षे एकत्र घालवली. 60 वर्षांहून अधिक काळ लोटला. तुमच्या प्रार्थना आणि सहानुभूतीबद्दल धन्यवाद."
FIR Against SP MLA Abu Azmi: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ठाण्यात सपा आमदार अबू आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; केली होती औरंगजेबाची स्तुती
Prashant Joshiनरेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून, उपमुख्यमंत्र्यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अबू आझमी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.
Mumbai Great Padmakar Shivalkar Dies: मुंबई क्रिकेटचे दिग्गज पद्माकर शिवलकर यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jyoti Kadamमुंबई क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेले पद्माकर शिवलकर यांचे निधन झाले आहे. त्याच्या 25 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत, त्याने 124 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 589 विकेट्स घेतल्या. परंतु तरीही त्यांना कधीही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
IND vs AUS, Champions Trophy 2025 Semi-Final Live Streaming: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamभारतातील जिओस्टार नेटवर्ककडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे प्रसारण हक्क आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्याचे डिजिटल स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
8th Pay Commission: पगारवाढ, महागाई भत्ता सुधारणा आणि अपेक्षित बदलांवरील महत्त्वाचे अपडेट्स; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGovernment Employees News: पगारवाढ, महागाई भत्ता सुधारणा आणि केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी बदलांसह आठवा वेतन आयोग कसा असेल याबाबत ताज्या घडामोडी घ्या जाणून.
Abu Azmi Aurangzeb Remark: 'औरंगजेब क्रूर नव्हता', अबू आझमी यांचे वक्तव्य; सर्वपक्षीयांकडून संताप, माफीची मागणी, गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसमाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बादशाह याच्याबद्दल काढलेल्या वक्तव्यावर सर्वपक्षीयांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी मार्च महिन्यातील मुहूर्त, जागतिक महिला दिन दणक्यात!
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना राज्य सरकार फेब्रुवारी 2025 महिन्यातील हप्ता देणार आहे. त्यामुळे 8 मार्च रोजीचा दिन महिलांसाठी दुहेरी अर्थाने खास असणार आहे.
Latur ST Bus Accident Video: लातूर-नांदेड रस्त्यावर एसटी बस अपघात, 36 जण जखमी, दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलातूर-नांदेड रस्त्यावर बस उलटून झालेल्या अपघातात 36 जण जखमी झाले आहेत. दुचाकीस्वरास वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली.
Ayodhya Ram Mandir Terror Plot Foiled: अयोध्येतील राम मंदिर दहशतवादी कट उधळला; संशयिताला अटक
Bhakti Aghavअब्दुल रेहमान अनेक दिवसांपासून बनावट ओळखपत्रासह फरीदाबादच्या पाली गावात राहत होता. जेव्हा अधिकारी त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात आले.
Govt Grants Navratna Status To IRCTC And IRFC: मोदी सरकारने आयआरसीटीसी आणि आयआरएफसीला दिला नवरत्न कंपनीचा दर्जा
Bhakti Aghavसार्वजनिक उपक्रम विभागाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टनुसार, आयआरसीटीसी आणि आयआरएफसी यांना 25 वे आणि 26 वे नवरत्न सीपीएसई बनवण्यात आले आहे.
Bird Flu in Cats: मांजरीस एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) संसर्ग, भारतातील पहिलीच घटना, मानवी संसर्गाच्या शक्यतेने चिंता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChhindwara Bird Flu: भारताने मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे पाळीव मांजरींमध्ये प्रथमच एव्हीयन इन्फ्लूएंझा (H5N1) प्रकरणे नोंदवली आहेत. शास्त्रज्ञ संभाव्य उत्परिवर्तन आणि मानवांसाठी जोखमीबद्दल चेतावणी देतात.
Rock Blasting Accident: मजुर विहीरीत असतानाच सुरुंग उडला; स्फोटामुळे शरीराच्या चिंधड्या; कारंजा लाड तालुक्यातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविहीरीतील सुरुंगाचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील एकांबा गावात घडली.