FIR Against SP MLA Abu Azmi: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ठाण्यात सपा आमदार अबू आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; केली होती औरंगजेबाची स्तुती

नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून, उपमुख्यमंत्र्यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अबू आझमी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.

Abu Azmi | (Photo Credit : Facebook)

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केले आहे. आझमींनी त्याला केवळ महानच म्हटले नाही तर, औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली असेही म्हटले. तो क्रूर शासक नव्हता, तो एक महान समाजसेवक होता, असेही ते म्हणाले. त्यांचे हे विधान समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निषेध व्यक्त करत, अबू आझमींवर तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले, आझमींची औरंगजेबाची स्तुती करण्याची हिंमत कशी झाली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अबू आझमीसारखे लोक अशी विधाने करून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून, उपमुख्यमंत्र्यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अबू आझमी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. अबू आझमी यांच्या विधानावर शिवसेना यूबीटी नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा: Abu Azmi Aurangzeb Remark: 'औरंगजेब क्रूर नव्हता', अबू आझमी यांचे वक्तव्य; सर्वपक्षीयांकडून संताप, माफीची मागणी, गुन्हा दाखल)

FIR Against SP MLA Abu Azmi:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now