Dhananjay Munde To Resign? धनंजय मुंडे होऊ शकतात पदावरून पायउतार; संतोष देशमुख हत्येप्रकरणी CM Devendra Fadnavis यांनी मागितला मंत्रीपदाचा राजीनामा- Reports
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे, ज्या त्यांच्यापासून वेगळ्या राहत आहेत, त्यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुंडे राजीनामा देतील असा दावा केला होता. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे नाव जोडल्यामुळे, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव सतत वाढत होता.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता. त्यामुळेच आता हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे जवळचे मंत्री धनंजय मुंडे हे सध्याच्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी रविवारी (2 मार्च) असा दावा केला होता की, धनंजय मुंडे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा देतील. करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतल्याचे म्हटले होते. धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, पण अजित पवारांनी जबरदस्तीने राजीनामा लिहायला लावला, असेही त्यांनी सांगितले. राजीनाम्याबाबत असे म्हटले जात आहे की, सरकार त्यांच्या राजीनाम्याचे कारण ‘आजारपण’ हे देईल. धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार आहे, ज्यामुळे त्यांना सतत बोलण्यात अडचण येत आहे.
बीडमधील वीज कंपनीकडून कथित खंडणी वसूल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशमुख यांचे अपहरण करण्यात आले, छळ करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी, आरोपपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ बनवून त्यांच्यावर लघवी केल्याचे उघड झाले होते. यानंतर लोकांचा संताप आणखी वाढला. आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात आरोपींविरुद्ध संतापामध्ये अजून भर पडली आहे. (हेही वाचा: Dhananjay Munde Appeals Against Maintenance Order: करुणा मुंडे यांच्याशी लग्न झालचं नाही! धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केले सत्र न्यायालयात अपील)
दरम्यान, धनंजय मुंडे हे परळी विधानसभेचे आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांचे पुत्र आहेत. धनंजय त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. याआधी 2024 मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर, त्यांनी 2019 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली आणि यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)