Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जनतेचा वाढता रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सहकारी वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे नाव जोडल्यामुळे, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव सतत वाढत होता. आता धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजीनाम्याची बातमी आल्यानंतर फडणवीस म्हणाले की, मुंडे यांनी राजीनामा माझ्याकडे सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आहे.

अशात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जनतेचा वाढता रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री फडणवीस यांची भेट घेतली आणि देशमुख हत्या प्रकरण आणि कराड याला आरोपी क्रमांक एक बनवण्यात आलेल्या इतर दोन संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दाखल केलेल्या आरोपपत्राच्या निकालावर चर्चा केली. (हेही वाचा: Dhananjay Munde Appeals Against Maintenance Order: करुणा मुंडे यांच्याशी लग्न झालचं नाही! धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केले सत्र न्यायालयात अपील)

Minister Dhananjay Munde Resigns:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now