Kiccha Sudeep's Mother Dies: कन्नड अभिनेता आणि टेलिव्हिजन होस्ट किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) ची आई सरोजा संजीव (Saroja Sanjeev) यांचे रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सरोजा संजीव यांनी सकाळी 7 वाजता जयनगर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सरोजा यांच्यावर वय-संबंधित आरोग्याच्या तक्रारीमुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची तब्येत आणखी खालावली. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर किच्चा सुदीपच्या आईला वाचवू शकले नाहीत.
अभिनेता किच्चा सुदीप यांच्या आईच्या निधनाची वार्ता समजताचं त्याच्या जवळचे नातेवाईक, चाहते, सहकारी आणि कन्नड चित्रपट सृष्टीतील लोकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून अभिनेत्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील त्याच्या व्यापक प्रभावासाठी ओळखला जाणारा सुदीप शेवटच्या क्षणी त्यांच्या आईसोबत होता. सरोजा संजीव दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. (हेही वाचा -Mangesh Kulkarni Passes Away: शीर्षकगीतांचे जादूगार मंगेश कुलकर्णी यांचे निधन; गाणी लिहून कमावले होते नाव)
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली -
ನಟ ಶ್ರೀ ಕಿಚ್ಚ ಸುದೀಪ್ ಅವರ ತಾಯಿ ಶ್ರೀಮತಿ ಸರೋಜಾ ಅವರು ದೈವಾಧೀನರಾದ ಸುದ್ದಿ ತಿಳಿದು ಮನಸ್ಸಿಗೆ ಅಪಾರ ನೋವಾಯಿತು. ಮೃತರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಚಿರಶಾಂತಿ ದೊರಕಲಿ, ಸುದೀಪ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬ ವರ್ಗದವರಿಗೆ ಅಗಲಿಕೆಯ ನೋವು ಭರಿಸುವ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಆ ಭಗವಂತ ಕರುಣಿಸಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ.
ಓಂ ಶಾಂತಿ 🙏@KicchaSudeep pic.twitter.com/tWTMOmKi1X
— DK Shivakumar (@DKShivakumar) October 20, 2024
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी ट्विटरवर सुदीप यांच्याबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सुदीप आणि सरोजा यांचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, 'अभिनेते किच्चा सुदीप यांच्या आई श्रीमती सरोजा यांच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावलं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि देव सुदीप आणि त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. ओम शांती.'