Samsung Galaxy F23 5G ट्रिपल रिअर कॅमेरासह भारतात लॉन्च; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स घ्या जाणून
Samsung Galaxy F23 5G (PC - Twitter)

दीर्घ प्रतीक्षेनंतर, सॅमसंगने आज आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना प्रीलोडेड व्हॉईस फोकस फीचर मिळेल. ज्याच्या मदतीने कॉल्स दरम्यान एक्सटर्नल नॉइज बंद करता येईल. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F23 5G किंमत -

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 4GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे, तर 6GB + 128GB मॉडेलची किंमत 18,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन एक्वा ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकते. त्याची विक्री 16 मार्चपासून सुरू होणार आहे. (वाचा - International Women's Day 2022: फक्त महिलांसाठी लॉन्च झाला 'हा' स्मार्टफोन; फीचर्स जाणून तुम्हीही व्हाल हैराण)

Samsung Galaxy F23 5G खास ऑफर -

Samsung Galaxy F23 5G सोबत, कंपनीने काही लॉन्च ऑफर देखील जाहीर केल्या आहेत. ग्राहक स्मार्टफोनसह रु. 1,000 चा झटपट कॅशबॅक घेऊ शकतात. जो ICICI बँकेच्या कार्डवर उपलब्ध असेल. याशिवाय दोन महिन्यांचे YouTube Premium सबस्क्रिप्शनही उपलब्ध असेल. काही खास ऑफर्समध्ये हा स्मार्टफोन 15,999 आणि 16,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F23 5G स्पेसिफिकेशन्स -

Samsung Galaxy F23 ला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसरवर काम करेल. जो F-सिरीजमध्ये प्रथमच येईल. डिव्हाइस 6.4-इंच सुपर AMOLED स्क्रीनसह येईल, ज्यामध्ये संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 असेल. याला 120Hz चा रिफ्रेश दर मिळेल आणि तो फुल एचडी रिझोल्यूशनसह येईल.

हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्याची मुख्य लेन्स 50MP असेल. याशिवाय 2MP टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स दिली जाऊ शकतात. फोनला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करेल. डिव्हाइस 3.5mm ऑडिओ जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. यामध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळू शकतो.