KKR vs CSK IPL 2021: चेन्नई विरोधात नाईट रायडर्सचा गोलंदाजीचा निर्णय, संघात झाले 2 बदल
कोलकाता नाईट रायडर्स आणि आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

KKR vs CSK IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात मनोरंजक सामना पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकला आणि पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे चेन्नई आपली विजयी लय कायम ठेवू इच्छित असतील तर कोलकाता विजयाच्या शोधात आहेत. अशास्थितीत सुपर किंग्सने आणि खेळाडूंच्या फॉर्मशी संघर्ष करणाऱ्या नाईट रायडर्सने अंतिम-11 मध्ये काही बदल केला आहेत. चेन्नईच्या विदेशी खेळाडूंनी छाप पडली आहे तर नाईट रायडर्स संघात या उलट चित्र पाहायला मिळत आहे. (IPL 2021: MS Dhoni याच्यानंतर हे 3 बनू शकतात CSK चे कर्णधार, बॅटिंग-फिल्डिंगने गाजवत आहे मैदान)

चेन्नईने ड्वेन ब्रावोला आपल्या प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती दिली असून वेगवान गोलंदाज लुंगी एनगीडीचा समावेश केला आहे. एनगीडीचा आयपीएलच्या 14व्या हंगामातील हा पहिलाच सामना असेल. दुसरीकडे, नाईट रायडर्सने हरभजन सिंह आणि शाकिब अल-हसन यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी कमलेश नागरकोटी आणि सुनील नारायणचा (Sunil Narine) समावेश केला आहे. दोन्ही संघ यापूर्वी स्पर्धेत 24 वेळा आमनेसामने आले असून सुपर किंग्स वरचढ राहिली आहे. चेन्नईने 15 सामन्यात, र कोलकाताने 9 सामन्यात चेन्नईवर मात केली आहे. इतकंच नाही तर चेन्नई आतापर्यंत कोलकाताकडून साखळी फेरीत पराभूत झालेली नाही. चेन्नईने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 2 सामन्यात तर कोलकाताने 3 सामन्यांपैकी केवळ 1 सामन्यात विजय मिळवला आहे.

पहा सुपर किंग्स-नाईट रायडर्सचा प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन: रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगीडी आणि दीपक चाहर.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन: नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरून चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.