Lifelike Statue of His Late Wife : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरात दिवंगत पत्नीची सिलिकॉन डमी ठेवला आहे. तपस संदिल्य या सेवानिवृत्त तपस संदिल्य यांनी कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत पत्नी इंद्राणीला गमावले होते. दिवंगत पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी  पत्नीचा सिलिकॉन पुतळा घरात बसवला आहे. 30 किलो वजनाचा हा पुतळा इंद्राणीच्या आवडत्या जागेवर सोफ्यावर ठेवण्यात आला आहे. इंद्राणी यांना प्रिय असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी त्याने डमीला सजवले आहे. मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन प्रसंगी त्यांनी परिधान केलेली रेशमी साडी देखील पुतळ्याला नेसवण्यात आली आहे. इंद्राणी यांचा जिवंत पुतळा बनवण्यासाठी जवळपास 2.5 लाख रुपयांचा खर्च आला आहे. 

पाहा फोटो:

Grieving Indian husband has £2,500 life-size silicon dummy of his dead wife made https://t.co/OFsQZDoJvz

— Daily Mail U.K. (@DailyMailUK) January 4, 2023

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)