Wrestlers Protest: ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाने अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पुन्हा निषेध नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले आहे. 3 महिन्यांनंतर कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा निषेध करण्यास सुरुवात केली आहे.जानेवारीमध्ये WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा, मानसिक छळाचा, डब्ल्यूएफआय निधीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोपही कुस्तीपटूंनी केला. क्रीडा मंत्रालयाने आंदोलक कुस्तीपटूंच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आरोपांची चौकशी करण्यासाठी मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली एक निरीक्षण समिती स्थापन केली. समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती, मात्र ती अनेकवेळा वाढवण्यात आली. दरम्यान, आता कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने एक व्हिडीओ पोस्ट करून आवाज उठवला आहे.
काय म्हणली उर्मिला, पाहा
In solidarity with our wrestlers ✊🏻✊🏻@HMOIndia @ianuragthakur @SakshiMalik @Phogat_Vinesh @BajrangPunia @aajtak @ndtv @ZeeNews @republic @zee24taasnews @abpmajhatv @ANI @News18India pic.twitter.com/Ppvd2OVzGk
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) April 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)