Amitabh Bachchan Hospitalised: बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांना काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ अभिनेत्याला शुक्रवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाहा पोस्ट:

 

अहवालानुसार, हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, अँजिओप्लास्टी प्रक्रिया त्याच्या हृदयावर केली गेली नव्हती तर त्याच्या पायातुन झाली आहे. अभिनेता किंवा त्याच्या कुटुंबाने त्याच्या हॉस्पिटलायझेशन किंवा अँजिओप्लास्टी प्रक्रियेबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)