मुंबईतील उन्हात ताहान भागवण्यासाठी SBI General Insurance कडून नागरिकांना फुकटात पाणी वाटप
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Olichel/Pixabay)

सध्या मुंबईत (Mumbai) वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची ल्हाईल्हाई होताना दिसून येत आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात वारंवार तहान लागते. त्यामुळे एसबीआय जनरल इन्सुरन्स (SBI General Insurance) कडून नागरिकांना मदतीचा हात म्हणून फुकटात पाणी वाटप करणार असल्याची घोषणा केली आहे.

एसबीआय जनरल इन्सुरन्सकडून हा उपक्रम मुंबई आणि ठाणे येथे राबवला जाणार आहे. त्याचसोबत डिलिव्हरी बॉय, इमारत कामगार, वाहतुक पोलीस, डब्बेवाल, सिक्युरिटी गार्ड्स आणि कामासाठी बाहेर पडणारे नागरिक किंवा विद्यार्थ्यांना फुकटात पाणी वाटप करणार आहेत. तसेच संपूर्ण मुंबईभर हा उपक्रम अर्धा महिनाभर राबवला जाणार आहे.(विदर्भातील चंद्रपूर येथे काल 48° तापमानासह उच्चांकी तापमानाची नोंद; पहा काय आहे आजचे तापमान)

हा उपक्रम 21 पासून सुरु झाला असून पहिल्या दोन दिवसात त्यांनी 6 हजार नागरिकांना फुकटात पाणी वाटप केल्याचे सांगितले आहे. बँकेचे मुख्य उद्दिष्ट हे तहानलेल्यांना पाण्याचे वाटप करणे आहे. तसेच नागरिकांकडून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बँकेच्या अधिकृत कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.