PM Modi and Rajiv Satav (Photo Credits: Twitter/FB)

काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांपासून केंद्रीय नेते सुद्धा सोशल मिडियाद्वारे राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील सोशल मिडियाद्वारे राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “राजीव सातव यांच्या जाण्याने संसदेतला मित्र गमावला” असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. राजीव सातव निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"संसदेतील माझे मित्र राजीव सातव जी यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अधिक क्षमता असलेले भविष्यातील आगामी नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांबद्दल मला दु:ख आहे. ओम शांती", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Rajiv Satav Passed Away: राजीव सातव यांच्या निधनानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मिडियाद्वारे राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. "काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति" असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील ट्विटद्वारे राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.