Earthquake | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा 3.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला.  अहवालानुसार, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. कोल्हापूरच्या पश्चिमेस 19 किमी अंतरावर असलेल्या कळे (Kale) गावाजवळ 38 किमी खोलीवर शनिवारी रात्री 11.49 वाजता भूकंपाची क्रिया नोंदवली गेली. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर हे पुण्यापासून 200 किमी आणि राज्याची राजधानी मुंबईपासून 375 किमी अंतरावर आहे.

रात्रीच्या सुमारास झालेल्या या भुकंपामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भूकंपाचे धक्के बसताच अनेक नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपाची तीव्रता ही फार जास्त नसली तरी धरणीकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते.