महाराष्ट्र

Kalyan Accident: अचानक ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनांना धडकले मिक्सर ट्रक, कल्याण येथील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

कल्याण पूर्वेला भरधाव मिक्सर ट्रकचे अचानक ब्रेक खराब झाल्याने मोठा अपघात झाला आहे.कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मिक्सर ट्रक बुडलिंक रोडवरून चक्की नाक्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकच्या धडकेत चार रिक्षा आणि एक छोटा टेम्पोला जबर धडक बसली.

Pune BMW Incident: पुणे येथे बीएमडब्ल्यू कारमधील उच्चभ्रू तरुणाचे शास्त्री चौकात लज्जास्पद वर्तन; व्हिडिओ व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आंतरराष्ट्रीय महिला दिनी पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने सार्वजनिक ठिकाणी लघवी केल्याने एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक; 8 आणि 9 मार्च ला वसई रोड आणि भाईंदर दरम्यान अत्यावश्यक कामांसाठी ब्लॉक नियोजित

Jyoti Kadam

पश्चिम रेल्वेने 8 आणि 9 मार्च 2025 रोजी वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अत्यावश्यक ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक नियोजित केला आहे.

Thane: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 47 लाख रुपयांची फसवणूक; ठाण्यातील व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी लावला चुना

Bhakti Aghav

पीडित व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे, गुरुवारी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' फसवी, कलाकारांच्या मानधनावर परिणाम; खासदाराचा आरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून वृद्ध कलाकार आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही योजना फसवी आहे, असा आरोप शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Nana Patekar: नाना पाटेकर यांना MeToo प्रकरणात दिलासा, कोर्टाने फेटाळली तनुश्री दत्ता हिची याचिका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

#MeToo Movement: मुंबईतील एका न्यायालयाने तनुश्री दत्ता हिच्या नाना पाटेकर यांच्यावरील #MeToo आरोपांची दखल घेण्यास नकार दिला आणि तिची याचिका फेटाळून लावली. काय म्हणाले कोर्ट घ्या जाणून.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Maharashtra Population 2025: लोकसंख्या वाढीत महाराष्ट्र अग्रेसर; राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात धक्कादायक आकडेवारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राची लोकसंख्या मार्च 2025 पर्यंत 12.8 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये काम करणारे वय आणि वृद्धांची संख्या वाढत आहे. शहरीकरणाचा ट्रेंड राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीस आकार देत आहे.

Advertisement

Mumbai Local Mega Block: उड्डाण पुलाच्या उभारणीमुळे मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर 2 दिवसांचा विशेष ब्लॉक

Shreya Varke

मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मुंबईत पुढील दोन दिवस मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक असणार आहे.मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-1) लाँचिंगसाठी हा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक आहे. शनिवारी 8 मार्च आणि रविवारी 9 मार्च रोजी हा प्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai: मुंबईत होळीनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे 16 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही तिकीट

Shreya Varke

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मुंबई विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण आणि पनवेल रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 8 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 पर्यंत बंद करण्यात आली आहे. होळीच्या काळात या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या अचानक वाढते. कुटुंबीय आणि मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात.

Mumbai-Sainagar Shirdi Vande Bharat Train: मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनचे महिलांकडून संचलन; आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 रोजी, मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे महिला चालवतील. ट्रेनच्या वेळा, मार्ग, थांबे आणि तिकिटांच्या किमतींबद्दल तपशील मिळवा.

Happy Women's Day 2025: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला CSMT रेल्वे स्थानकातील हेरिटेज बिल्डिंगला गुलाबी रंगाची रोषणाई; पहा नजारा

Dipali Nevarekar

महिलांचे सामर्थ्य, धैर्य आणि यश साजरे करण्यासाठी ही गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.

Advertisement

Platform Tickets Restrictions: होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची प्लॅटफॉर्म वरील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर निर्बंध; पहा कोणत्या स्थानकावर नियम लागू

Dipali Nevarekar

होळीसाठी सध्या मध्य रेल्वे कडून अनेक स्पेशल ट्रेन्स चालवल्या जात आहेत. यामध्ये काही आरक्षित आणि काही अनारक्षित ट्रेन्स आहेत.

Abu Azmi Letter to Assembly Speaker: 'माझे निलंबन मागे घ्या'; अबू आझमी यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

Bhakti Aghav

अबू आझमी यांनी पत्रात लिहिले आहे की, 3 मार्च रोजी सभागृहातून बाहेर काढल्यानंतर मीडियाच्या लोकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची तुलना राहुल गांधींशी केल्याबद्दल माध्यमांनी त्यांना औरंगजेबाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या कारकिर्दीने आकर्षित होऊन इंग्रज भारतात आले.

Special Block On Kasara Railway Station: कसारा रेल्वे स्थानकात 8-9 मार्च दरम्यान पूलाच्या कामासाठी 3 ब्लॉक; जाणून घ्या अपडेट्स

Dipali Nevarekar

तिन्ही ब्लॉकच्या दरम्यान सकाळी 9.34 वाजता सीएसएमटी स्टेशन मधून सुटणारी कसारा लोकल आसनगाव रेल्वे स्टेशन पर्यंतच चालवली जाणार आहे.

Chicken Bone Stuck In Woman Throat: चिकन खाताना गळ्यात अडकले हाड, महिलेवर आठ तास शस्त्रक्रिया; लाखो रुपये खर्च

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Unusual Medical Case: मुंबईतील एका महिलेच्या घशात कोंबडीचे हाड अडकल्याने तिचे जेवण वैद्यकीय परीक्षेत बदलले, ज्यामुळे आठ तासांची शस्त्रक्रिया झाली. हाड खाली जाण्याऐवजी वर सरकल्याने डॉक्टर गोंधळले. संपूर्ण कथा वाचा.

Advertisement

Heatwave In Konkan: 9-11 मार्च दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड सह दक्षिण कोकणाला IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

Dipali Nevarekar

अतिमहत्त्वाचे काम नसल्यास दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Economic Survey Report 2024-25: महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर 7.3% राहणार; आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

Dipali Nevarekar

2024-25 च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 7.3 % वाढ अपेक्षित आहे तर देशाच्या अथर्व्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना आजवर किती पैसे मिळाले? सरकारने विधिमंडळात दिली माहिती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांवर राज्य सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने दिलेली आकडेवरी जून 2024 ते डिसेंबर 2024 या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये केलेल्या खर्चाची आहे.

Man Blames Wife for Suicide: मुंबईतील हॉटेलच्या खोलीत 41 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि मावशीला धरले जबाबदार

Bhakti Aghav

निशांत त्रिपाठी नावाच्या एका तरुणाने मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीला शेवटचे पत्र लिहिले. निशांतने हे पत्र कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केले. त्याने सर्वात आधी त्याच्या आईसाठी, त्याच्या भावासाठी आणि त्याच्या बहिणीसाठी शेवटचा संदेश लिहिला. यानंतर, या तरुणाने आपल्या पत्नीला शेवटचे पत्र लिहिले, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी तिला आणि तिच्या मावशीला जबाबदार धरले.

Advertisement
Advertisement