Mumbai: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मुंबई विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण आणि पनवेल रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 8 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 पर्यंत बंद करण्यात आली आहे. होळीच्या काळात या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या अचानक वाढते. कुटुंबीय आणि मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. यामुळे रेल्वे स्थानकांवर जास्त गर्दी होऊ शकते, ज्याचा परिणाम प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे वाहतुकीवर होऊ शकतो.
प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 16 मार्चपर्यंत बंद
कोणाला मिळणार सवलत?
ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री १६ मार्चपर्यंत बंद आहे. कोणाला मिळणार सवलत? ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.