Maharashtra Economic Survey Report 2024-25: महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर 7.3% राहणार; आर्थिक पाहणी अहवालात अंदाज
2024-25 च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 7.3 % वाढ अपेक्षित आहे तर देशाच्या अथर्व्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे.
महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर 7.3% राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात दर्शवण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कृषी क्षेत्राचा विकास 8.7%, उद्योग क्षेत्राचा विकास 4.9% तर सेवा क्षेत्राचा विकास 7.8% असेल असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्याचा आर्थिक संकल्प 10 मार्च दिवशी अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत. 2024-25 च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 7.3 % वाढ अपेक्षित आहे तर देशाच्या अथर्व्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे.
आर्थिक पाहणी अहवाल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)