महाराष्ट्र

Starbucks Coffee: मुंबईतील महिलेने ऑर्डर केली तब्बल 9.4 लाख रुपयांची स्टारबक्स कॉफी; Zomato ने खास व्हिडिओ बनवून केला सलाम (Watch)

Prashant Joshi

एका मुलीने कॉफीसाठी 9.4 लाख रुपये खर्च केल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. झोमॅटोचे मार्केटिंग हेड साहिबजीत सिंग साहनी यांनी ही जाहिरात शेअर केली आहे.

Har Ghar Tiranga Abhiyan: 'घरोघरी तिरंगा' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ; राज्यातील अडीच कोटी घरावर फडकवला जाणार राष्ट्रध्वज

Prashant Joshi

मुंबई महानगरपालिकेच्या यांच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ऑगस्ट क्रांती मैदान येथे ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला.

Psychiatrist Counsellors At Medical Colleges: नैराश्य, चिंताग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार मदत; महाराष्ट्र सरकार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करणार

Prashant Joshi

प्राध्यापक मानसशास्त्र, सहयोगी प्राध्यापक मानसशास्त्र आणि एक अधीक्षक यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती, या विषयावर विकसित करण्यात येत असलेल्या यंत्रणेचा वेळोवेळी आढावा घेईल.

पुण्यातील उद्योगपती Yohan Poonawalla आणि पत्नी Michelle यांनी मुंबईमध्ये खरेदी केले अलिशान घर; किंमत 500 कोटी

Prashant Joshi

ही भव्य हवेली सुमारे 30,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने हे अलिशान घर 500 ते 700 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. या महागड्या मालमत्तेच्या खरेदीच्या वृत्ताने रिअल इस्टेट मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisement

FIR Against Puja Khedkar's Father: पूजा खेडकरचे वडिल दिलीप खेडकर यांच्या अडचणीत वाढ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhakti Aghav

फिर्यादीत तक्रारदाराने म्हटले आहे की, पूजा खेडकर सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर असताना दिलीप खेडकर यांनी तहसीलदार दिपक आकडे यांच्या विरोधात धमकीची भाषा वापरली होती. तसेच प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी त्यांच्या मुलीसाठी केबिन देण्यास सांगितले.

Palghar Hit And Run Case: पालघर मध्ये दुचाकीस्वारला भरधाव वेगातील कार ने उडवलं; 27 वर्षीय युवकाचा मृत्यू

Dipali Nevarekar

पालघर च्या मनोर मध्ये 27 वर्षीय मुलाचा कार च्या धडकेत मृत्यू झाला आहे.

Viral Video: पुणे सोलापूर महामार्गावर टायर फुटल्याने बसला भीषण आग, चालकामुळे वाचले 17 प्रवासी

Shreya Varke

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका खासगी बसला भीषण आग लागली होती. या बसमध्ये 17 प्रवासी होते, सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. टायर फुटल्याने बसला आग लागली होती. बस हैदराबादहून पुण्याला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील कदमवाकबस्ती गावाजवळील एका हॉटेलसमोर बसला आग लागली होती. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते.

Mumbai College Hijab Ban Case: मुस्लीम विद्यार्थिनींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; हिजाबवर बंदी घातल्याबद्दल मुंबई कॉलेजला फटकारले, ड्रेसकोडला स्थगिती

Prashant Joshi

मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा घालण्यास बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement

Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे 90 टक्के भरली; पाणी कपात होणार रद्द?

Amol More

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,15,165 दशलक्ष लिटर इतका झाला.

Pune Weather forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज ९ ऑगस्ट २०२४ रोजी तापमान २५.०९ डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.35 °C आणि 27.84 °C दर्शवतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, पुणे, रायगड, धुळे, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

Kalyan Crime: पेन्शन वरून नातेवाईकांचा बॅंकेत तुफान राडा, दोन कर्मचारी जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

कल्याण येथील एका बॅंकेत पेन्शनवरून संतापलेल्या नातेवाईकांनी तुफान राडा केला. या घटनेवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंक परिसरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Chhatrapati Sambhajinagar Nagar: 19 ज्युनियर विद्यार्थ्यांसोबत सिनियर्सची रॅगिंग, संभाजीनगरच्या नर्सिंग कॉलेजमध्ये झालेल्या घटनेत 11 विद्यार्थ्यांना केले निलंबित

Shreya Varke

छत्रपती संभाजीनगर घाटीतील एका नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या सत्रातील 19 विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग केल्याची घटना समोर आली आहे. रॅगिंगच्या नावावर ज्युनियर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे, याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने चौथ्या आणि पाचव्या सत्राच्या एकूण 11 विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित केले आहे. यासोबतच या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढल्याची माहितीही कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai Weather forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

आज ९ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील तापमान २८.३२ डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 28.44 °C दर्शवतो. मुंबईत आता पावसाने काहीसी उसंत घेतकी आहे. ह्या पूर्ण आठवड्या भरात मुंबईत पावसाचा जोर कमी रहाण्याची शक्यता आहे.

Video: छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेनमध्ये बिघाड; रोहिणी खडसे, जयंत पाटील थोडक्यात बचावले

Pooja Chavan

शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारादरम्यान आणि शिवस्वराज्य यात्रेच्या वेळीस एक दुर्घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी घेऊन जाणारी क्रेन तुटल्याची घटना घडली.

Pune Cyber Fraud Cases: पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ; या वर्षी जानेवारी-जुलै दरम्यान समोर आली 850 प्रकरणे, 198.45 कोटींचे नुकसान

Prashant Joshi

हे फसवणूक लोक करणारे अनेकदा इंटरपोल, इंटेलिजन्स ब्युरो (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), गुन्हे शाखा आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सारख्या प्रतिष्ठित एजन्सीची नावे वापरून फसवणूक करतात.

Mumbai Man Falling Into a Manhole: मॅनहोलमध्ये पडून सफाई कामगाराचा मृत्यू, बोरिवली येथील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्राच्या मुंबईत गुरुवारी मॅनहोलमध्ये सफाई करताना सफाई कामगाराचा पडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी सफाई कर्मचारी साफ सफाई करत होता. ही घटना गोखले रोडवरील सिंपोली रोडवर घडली

Advertisement

Mumbai MHADA Housing Lottery 2024: मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांसाठी housing.mhada.gov.in वर आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या पात्रता निकष ते घरं कोणत्या भागात उपलब्ध?

Dipali Nevarekar

आज म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in वरून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. तसेच अर्जदार MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करून देखील अर्ज दाखल करू शकतात.

Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; कलाकारांना अश्रू अनावर

Amol More

आगीच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही भेट दिली. दरम्यान, या नाटयगृहात अनेक अजरामर नाटके झाली, अनेक दिग्गज कलाकार घडले. राजश्री शाहू महाराजांनी बांधून दिलेला हा राजाश्रय ढासळल्याचे पाहताना अनेक कलाकारांना अश्रु अनावर झाले.

Pune Zika Virus: चिंताजनक, पुणे शहरात झिका व्हायरच्या रुग्णाच्या संख्येत वाढ, 7 गर्भवती महिला पॉझिटीव्ह

Pooja Chavan

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून झिका विषाणू पसरत चालला आहे. पुणे महानगरपालिकेने जून पासून झिका विषाणूची ७३ प्रकरणे नोंदवली आहेत. माहितीनुसार, बुधवारी यात आणखी सात प्रकरणे नोंदवली गेली.

Potholes on Highways: ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्ड्यांबाबत राज्य सरकार गंभीर; मुख्यमंत्री करणार रस्त्यांची पाहणी

टीम लेटेस्टली

ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो तेथे प्रिकास्ट पॅनलचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यंत्रणांनी समन्वयातून काम करावीत. दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement