Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; कलाकारांना अश्रू अनावर
दरम्यान, या नाटयगृहात अनेक अजरामर नाटके झाली, अनेक दिग्गज कलाकार घडले. राजश्री शाहू महाराजांनी बांधून दिलेला हा राजाश्रय ढासळल्याचे पाहताना अनेक कलाकारांना अश्रु अनावर झाले.
कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या लागली. आगीच्या प्रचंड ज्वालांनी नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले. या नाट्यगृहाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा आहे. राजाराम महाराज यांनी करवीर संस्थांमधील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून पॅलेस थेटरची निर्मिती केली होती. नंतर त्याचे रूपांतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले होते. अनेक अजरामर नाटके झालेले हे नाटयगृह आगीत जळून खाक झाल्याने सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करावं लागले. या आगीचं नेमकं कारण कळलं नसलं, तरी शॉर्टसर्किटनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - Potholes on Highways: ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्ड्यांबाबत राज्य सरकार गंभीर; मुख्यमंत्री करणार रस्त्यांची पाहणी)
आगीच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही भेट दिली. दरम्यान, या नाटयगृहात अनेक अजरामर नाटके झाली, अनेक दिग्गज कलाकार घडले. राजश्री शाहू महाराजांनी बांधून दिलेला हा राजाश्रय ढासळल्याचे पाहताना अनेक कलाकारांना अश्रु अनावर झाले. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कलानगरी कोल्हापुरातील अनेक रंगकर्मींनी नाट्यगृहाकडं धाव घेतली. बऱ्या-वाईट घटनांचा जिवंत साक्षीदार असलेला आणि कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा डोळ्यादेखत भस्म होताना पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले.
खासबाग कुस्ती मैदानाचं व्यासपीठ संपूर्णपणे लाकडाचं असल्यानं ही आग जोरात भडकली. या कुस्ती मैदानाला लागूनच केशवराव भोसले नाट्यगृह असल्यानं त्यालाही आग लागली. केशवराव भोसले नाट्यगृह आणि कुस्ती मैदानाला लागूनच खाऊ गल्ली असून इथं खवय्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळं या परिसरात आग नियंत्रणात आणण्यासाठी तसंच आग पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. दरम्यान अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.