Pune Zika Virus: चिंताजनक, पुणे शहरात झिका व्हायरच्या रुग्णाच्या संख्येत वाढ, 7 गर्भवती महिला पॉझिटीव्ह
पुणे महानगरपालिकेने जून पासून झिका विषाणूची ७३ प्रकरणे नोंदवली आहेत. माहितीनुसार, बुधवारी यात आणखी सात प्रकरणे नोंदवली गेली.
Pune Zika Virus: पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून झिका विषाणू पसरत चालला आहे. पुणे महानगरपालिकेने जून पासून झिका विषाणूची ७३ प्रकरणे नोंदवली आहेत. माहितीनुसार, बुधवारी यात आणखी सात प्रकरणे नोंदवली गेली. झिका विषाणूची लागण होऊन आतापर्यंत चार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे सर्व रुग्ण इतर आजारांनी त्रस्त होते. (हेही वाचा- पुणेकरांची चिंता वाढली; शहरात झिका व्हायरसचे आणखी सात रुग्ण आढळले)
मिळालेल्या माहितीनुसार, बुधावारी एकुण सात गर्भवती महिलांची विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. राज्यातील गर्भवती महिलांची झिका पॉझिटीव्हची संख्या ३७ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, गर्भवती महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.
पीएमसीचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, आम्ही झिका विषाणूवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काळजी करण्यासारखे काहीही नाही. गुरुवारी एकही पॉझिटीव्ही रुग्णा आढळला नाही. नियमित तपासणी केली जात आहे. तसेच डास उत्पतीच्या ठिकाण आढळल्यास आम्ही कठोर कारवाई करत आहोत.
कसा तयार होतो झिका
हा एक भयंकर विषाणू आहे. जो मानवी मेंदूला परिणाम करतो. हा सर्वप्रथम केरळ या राज्यात आढळून आला. त्यानंतर केरळ सरकारने याला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस असे नाव दिले आहे. हा विषाणू घाणेरड्या पाण्यात सापडणाऱ्या प्री लिव्हिंग अमिबामुळे होतो. ते नाकाच्या पातळ त्वचेतून शरिराच्या आत प्रवेश करतो. ताप, उलट्या, डोकेदुखी, चक्कर, अस्वस्थ यासारखं लक्षणे दिसून येतात.