Kalyan Crime: पेन्शन वरून नातेवाईकांचा बॅंकेत तुफान राडा, दोन कर्मचारी जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

या घटनेवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंक परिसरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Representative Image

Kalyan Crime: कल्याण येथे पेन्शनवरून संतापलेल्या नातेवाईकांनी बॅंकेत तुफान राडा केला. या घटनेवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंक परिसरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस बॅंकेतील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. (हेही वाचा- गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी चोरी! नववीच्या विद्यार्थ्याने आईचे दागिने विकून प्रेयसीला गिफ्ट केला आयफोन)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील पश्चिम बॅंक ऑफ बडोदरा या बॅंकेत हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहे. बॅंकेच्या बाहेर रक्त पडले होते. आरोपी हल्ला करून फरार झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली की, आजीच्या पेन्शनवरून दोन नातेवाईक एकमेकांशी भडकले होते.

कल्याण येथील रहिवासी असलेले राहूल परमार आणि विजय परमार यांच्यां मुलांनी बॅंकेत एकमेकांवर हल्ला केला होता. त्यांच्या आजीच्या पेन्शनवरून दोघे जण बॅंकेत भांडू लागले होते. दोघे जण बॅंकेत जोरजोरात भांडू लागले. आजीच्या पेन्शनवर आमचा देखील हक्क असल्याचा सांगत वाद सुरु झाला होता. भांडणात मद्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोन बॅंक कर्मचारी जखमी झाले. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांवर गुन्हा दाखल केला