Starbucks Coffee: मुंबईतील महिलेने ऑर्डर केली तब्बल 9.4 लाख रुपयांची स्टारबक्स कॉफी; Zomato ने खास व्हिडिओ बनवून केला सलाम (Watch)

झोमॅटोचे मार्केटिंग हेड साहिबजीत सिंग साहनी यांनी ही जाहिरात शेअर केली आहे.

Zomato (PC - Facebook)

Starbucks Coffee: सध्या कॉफीचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. कॉफीची विशेष आवड असणारे लोकही आपल्या आजूबाजूला आढळतात. मोठ मोठ्या शहरात खास कॉफीसाठी प्रसिद्ध असणारे अनेक कॅफे आहेत. यातीलच एक नाव म्हणजे स्टारबक्स. तर मुंबईच्या मिश्कत नावाच्या मुलीने, ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटो (Zomato) वरून स्टारबक्स कॉफी ऑर्डर करण्यासाठी तब्बल 9.4 लाख रुपये खर्च केले आहेत. झोमॅटोने यावर एक जाहिरातही बनवली आहे, ज्यामध्ये मिश्कातचे कॉफीवरचे विलक्षण प्रेम दाखवण्यात आले आहे.

आजकाल ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्सवरून अन्नपदार्थ मागवण्याचे प्रमाण बरेच वाढले आहेत. लोक विविध पदार्थांसाठी अशा ॲप्सवर महिन्याला हजारो रुपये खर्च करतात. मात्र एका मुलीने कॉफीसाठी 9.4 लाख रुपये खर्च केल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. झोमॅटोचे मार्केटिंग हेड साहिबजीत सिंग साहनी यांनी ही जाहिरात शेअर केली आहे. स्टारबक्सच्या सहकार्याने झोमॅटोने ही जाहिरात व्तायार केली आहे. (हेही वाचा: Zomato Food Bill: 40 रुपये किमतीचा उपमा झोमॅटोवर 120 रुपयांना विकला जात आहे? मुंबईतील पत्रकाराने रेस्टॉरंटचे बिल शेअर करत केला खुलासा)

पहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by StartupNews Fyi (@startupnews.fyi)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)