The Maharashtra State Common Entrance Test Cell कडून आज पीसीएम, पीसीबी ग्रुपच्या सीईटी परीक्षेची उत्तरतालिका अर्थात आन्सर की जारी करण्यात येणार आहे. यंदा ज्या विद्यार्थ्यांनी पीसीएम,पीसीबी ची परीक्षा दिली आहे त्यांना निकालापूर्वी आन्सर की mahacet.org या आपल्या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. आन्सर की पाहण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना लॉगिन करण्याकरिता अॅप्लिकेशन नंबर, जन्म तारीख आदी तपशील द्यावे लागणार आहेत.
MHT CET 2022 प्रोव्हिजनल आन्सर की ला आव्हान देण्यासाठी विद्यार्थ्यांना 800 रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा दर 600 रूपये असणार आहे. विद्यार्थी आपले आक्षेप 4 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच नोंदवू शकणार आहेत. MHT CET 2022 Result Date: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2022 च्या निकालाची तारीख जाहीर; उद्या cetcell.mahacet.org वर पाहू शकता Answer Key .
MHT CET Answer Key 2022 कशी कराल डाऊनलोड?
- अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- होम पेज वर MHT CET answer key download link दिसेल.
- आता तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाका.
- यानंतर स्क्रिनवर MHT CET 2022 answer key दिसेल.
- आता तुमची आन्सर की तुम्ही डाऊनलोड करू शकाल.
यंदा MHT CET Result 2022 सप्टेंबर 15, 2022 दिवशी जाहीर होणार आहे. यासाठी पीसीएम ग्रुपची परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान झाली आहे तर पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान झाली आहे.
2023-24 पासून सीईटी आणि 12 वी चे गुण यांचं मूल्य सारखेच ठेवण्याचा मानस काही महिन्यांपूर्वी घोषित झाला आहे. त्यावर अंतिम निर्णय होणं अद्याप बाकी आहे. तसेच आता एमएचटी सीईटी परीक्षा वर्षातून दोनदा देण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे.