MHT CET 2022 Result Date: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2022 च्या निकालाची तारीख जाहीर; उद्या cetcell.mahacet.org वर पाहू शकता Answer Key
Representational Image (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2022 (MHT CET 2022) संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सीईटी परीक्षेची अन्सर की आणि निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (Maharashtra State Common Entrance Test Cell), महाराष्ट्र नुसार, यंदाच्या एन्ट्रन्स परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. त्याआधी एमएचटी सीईटी परीक्षेची अन्सर की 01 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्र सीईटी संदर्भात जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका, उमेदवारांचे प्रतिसाद आणि योग्य उत्तर-की 01 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवारांच्या तक्रारी, त्यांचे ऑब्जेक्शन्स 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेतल्या जातील. त्यानंतर पुढील टप्प्यात 15 सप्टेंबर 2022 पूर्वी निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांनी 1 सप्टेंबर रोजी परीक्षेची उत्तरपत्रिका डाउनलोड केल्यानंतर त्यांचे गुण तपासावेत आणि त्यांची सर्व उत्तरे बरोबर तपासली गेली आहेत की नाही हे पहावे. त्यानंतर तुम्ही त्याबाबत आक्षेप नोंदवू शकता.

(हेही वाचा: परीक्षेत कमी गुण दिल्याच्या रागातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून केली मारहाण)

एमएचटी सीईटीची पीसीएम (PCM) ग्रुपची परीक्षा 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात आली. त्याच वेळी, एमएचटी सीईटीची पीसीबी (PCB) ग्रुपची परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. एवढेच नाही तर 29 ऑगस्ट 2022 रोजी निश्चित केंद्रांवर फेरपरीक्षा घेण्यात आली. एमएचटी सीईटी परीक्षेची अन्सर की आणि निकाल प्रकाशित झाल्यानंतर ते mahacet.org अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. परीक्षेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी फक्त अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.