ठळक बातम्या

Team India Stats In T20I 2024: यंदाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी राहिली 'खास', वाचा थक्क करणारी आकडेवारी

Nitin Kurhe

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. यावर्षी टीम इंडियाची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी ठरली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकण्यासोबतच या संघाने या वर्षी केवळ 2 सामने गमावले आहेत. टीम इंडियाची आकडेवारी पाहू.

Nikki Tamboli Hot Photoshoot: Bigg Boss फेम निक्की तांबोळीचे हॉट फोटोशुट (Watch Video)

Amol More

निक्की तांबोळी तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या या फोटोशूटने पुन्हा एकदा सिद्ध केले की तिला तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची कला चांगलीच अवगत आहे.

Jhansi Medical College Accident: झाशी मेडिकल कॉलेज दुर्घटनेच्या तपासासाठी 4 डॉक्टरांची विशेष समिती स्थापन

Amol More

या प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. या चौकशी समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे महासंचालक असतील. याशिवाय वैद्यकीय आरोग्य सेवा संचालक, वैद्यकीय आरोग्य सेवांचे अतिरिक्त संचालक आणि अग्निशमन महासंचालकांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी या समितीचे सदस्य असतील.

New Zealand vs England Test Series 2024 Full Schedule: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 'या' दिवसापासून होणार सुरुवात, येथे जाणून घ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

Nitin Kurhe

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NCB) या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. अनुभवी फलंदाज केन विल्यमसन दुखापतीनंतर संघात परतला आहे. फिटनेसमुळे केन विल्यमसन भारताविरुद्धच्या मालिकेतही खेळू शकला नाही. याशिवाय न्यूझीलंडने प्रथमच युवा अष्टपैलू खेळाडू नॅथन स्मिथची कसोटी संघात निवड केली आहे.

Advertisement

Australia Beat Pakistan, 2nd T20I Full Highlights: स्पेन्सर जॉन्सनच्या घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाज नतमस्तक, ऑस्ट्रेलियाने 13 धावांनी जिंकला सामना; येथे पाहा AUS vs PAK सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Govinda Health Update: महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्ध्यावरच सोडून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना

Amol More

माजी खासदार गोविंद यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेत आहेत.

West Indies vs England 4th T20I 2024 Live Streaming: चौथ्या टी-20 मध्ये इंग्लंडला कडवी टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडिज उतरणार मैदानात, इथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. इंग्लंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

PAK vs AUS 2nd T20I 2024: लाजिरवाण्या विक्रमांची बरोबरी करण्यात पाकिस्तानी संघ पहिला, आता पुन्हा केला 'हा' पराक्रम

Nitin Kurhe

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात त्यांनी 20 षटकात 9 गडी गमावून 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानी संघाची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ 19.4 षटकात केवळ 134 धावांवरच मर्यादित राहिला.

Advertisement

Tamanna Bhatia Weight Gain: वाढलेल्या वजनावरुन अभिनेत्री तमन्ना भाटिया झाली ट्रोल, कमेंटमध्ये लोकांनी वापरली अभद्र भाषा

Amol More

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती कटआउट ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तमन्नाचे वजन थोडे वाढलेले दिसत आहे. तिने कटआउट बॅकलेस टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली होती.

Border Gavaskar Trophy 2024-25: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, हेड टू हेड रेकॉर्ड, सामना कधी आणि कुठे पाहणार विनामूल्य? एका क्लिकवर घ्या जाणून

Nitin Kurhe

दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. हे सामने पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. भारताने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

Australia Beat Pakistan, 2nd T20I Scorecard: स्पेन्सर जॉन्सनची दुसऱ्या T20 सामन्यात शानदार गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 13 धावांनी पराभव करत मालिका टाकली खिशात

Amol More

ऑस्ट्रेलियन कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.

Tim Paine Target Gautam Gambhir: 'टीम इंडियाचे सर्वात मोठे टेन्शन..', टीम पेनने गौतम गंभीरवर केला मोठा हल्ला

Nitin Kurhe

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रिकी पाँटिंगबद्दल केलेल्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल चिंता व्यक्त करताना, टीम पेन म्हणाले की आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील पाहुण्या संघासाठी सर्वात मोठी चिंता दबावाखाली शांत राहण्याची असमर्थता असू शकते.

Advertisement

Sanju Samson: संजू सॅमसनच्या शॉटने मुलगी झाली जखमी, गालावर चेंडू लागल्याने मैदानात लागली रडू

Amol More

या महिला चाहत्याचा रडण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने महिलेला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देऊन उदारतेचे उदाहरण दिले

ICC Champions Trophy 2025: 15 ते 26 जानेवारी दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात

Amol More

पाकिस्ताननंतर अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अखेरीस भारत असा या ट्रॉफीचा प्रवास असणार आहे. आयसीसीने या संदर्भात एक पत्रक जारी केले

World's Largest Coral: सॉलोमन बेटांवर सापडले आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रवाळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शास्त्रज्ञांनी सॉलोमन बेटांवर आतापर्यंत नोंदवलेले सर्वात मोठे प्रवाळ शोधले आहे. जे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रवाळ म्हणून ओळखले गेले आहे.

Rahul Gandhi, Sharad Pawar Helicopter Check by EC Officials: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

Bhakti Aghav

निवडणूक आयोगाच्या (EC) अधिकाऱ्यांनी शनिवारी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. तथापी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही रायगडमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

Advertisement

Greater Noida Shocker: ग्रेटर नोएडामध्ये रात्रीच्या अंधारात बैलाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

टीम लेटेस्टली

ग्रेटर नोएडामध्ये सुपरटेक ऑक्सफर्ड स्क्वेअरजवळ एका बैलाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला.

OMN vs NED, 3rd T20I Live Toss And Playing XI Update: ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Amol More

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दोन्ही संघ या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत.

Assembly elections 2024: भाजप आणि महायुती बॅकफूटवर? नरेंद्र मोदी यांचे नरमाईचे धोरण; अजित पवार यांचा अपक्ष उमेदवाराल पाठिंबा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांनी करमाळा येथे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या बाजूला भाजप आणि महायुती बॅकफूटला गेली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका करणे टाळताना दिसत आहेत.

Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 5 नक्षलवादी ठार; दोन सुरक्षा जवान जखमी

Bhakti Aghav

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, अबुझमदच्या जंगलात चकमक सुरू आहे. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement