Govinda Health Update: महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्ध्यावरच सोडून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना

माजी खासदार गोविंद यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेत आहेत.

Govinda (PC - Facebook)

Govinda Health Update: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्यात आला होता. पाचोरा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर रोड शो सुरू असताना काही वेळाने त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्याच्या छातीत दुखू लागताच गोविंदाच्या पायातही दुखू लागले. यानंतर ते रोड शो मध्येच सोडून मुंबईला रवाना झाला. गोविंदाने काही महिन्यांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून सध्या तो महायुतीचा प्रचार करत आहे.  (हेही वाचा  -  Rahul Gandhi, Sharad Pawar Helicopter Check by EC Officials: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी )

माजी खासदार गोविंद यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेत आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे अस आवाहन मतदारांना केले. पाचोरा येथे गोविंदाला गोळी लागलेला पाय दुखू लागला. अचानक पाय दुखण्यासह त्याला छातीत अस्वस्थ जाणवू लागलं. यानंतर त्याने, रोड शो अर्धवट सोडून त्याने मुंबईकडे परतणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात 4 दिवसांनी विधानसभा निवडणुका आहेत आणि दोन दिवसांनी निवडणूक प्रचार थांबणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत असून निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत.