Sanju Samson: संजू सॅमसनच्या शॉटने मुलगी झाली जखमी, गालावर चेंडू लागल्याने मैदानात लागली रडू
भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने महिलेला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देऊन उदारतेचे उदाहरण दिले
IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावण्याची सवय लागली आहे. त्याने अवघ्या पाच डावांत तीन शतके झळकावली आहेत, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात सॅमसनने असा फटका मारला की चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलीच्या चेहऱ्याला लागला. क्रिकेटचा चेंडू अतिशय मजबूत असतो त्या महिला चाहत्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाच करता येईल. (हेही वाचा - Sanju Samson New Record: संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला, भारतीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू )
संजू सॅमसनने डावाच्या 10व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजी करत होता, दुसरीकडे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या चेंडूवर सॅमसनने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. सॅमसन षटकार मारण्यात यशस्वी ठरला, पण चेंडू मारल्यानंतर तो थेट मुलीच्या गालावर लागला. त्याचा प्रभाव इतका होता की महिला चाहत्यांला बर्फ लावताना दिसल्या. कॅमेरा सॅमसनकडे वळला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही काळजीचे भाव दिसत होते.
पाहा पोस्ट -
या महिला चाहत्याचा रडण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने महिलेला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देऊन उदारतेचे उदाहरण दिले तसेच सुत्राच्यामते संजूने त्यामहिलेच्या सर्व उपचाराचा खर्च उचलणार आहे. दुसरीकडे, मॅच लाईव्ह पाहताना फोनवर चॅटिंग करणं ही चांगली गोष्ट नाही, असं म्हणत एका चाहत्याने मुलीला ट्रोल केलं.