ठळक बातम्या
Fire At Shop In Bavdhan: बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavपुणे शहरातील बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Bomb Threat at Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बची धमकी निघाली खोटी; फसवा कॉल करणाऱ्या तरुणाला घेण्यात आले ताब्यात
Bhakti Aghavसकाळी 9 वाजता एका अज्ञात व्यक्तीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. पोलिसांनी त्वरीत सखोल कारवाई करून प्रत्युत्तर दिले. प्लॅटफॉर्म 2 वर तपासणी करण्यात आली. परंतु, याठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.
SA W vs ENG W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 ने केले पुनरागमन
Amol Moreइंग्लंड संघाने केवळ 24 षटकांत 135 धावांचे लक्ष्य गाठले. टॅमसिन ब्युमाँटने 52 चेंडूत 34 धावा आणि मैया बाउचियरने 36 चेंडूत 33 धावा केल्या. डॅनी व्याट-हॉजने 25 धावांची नाबाद खेळी खेळली आणि इंग्लंडला विजयापर्यंत नेले.
Singham Again OTT Release Date: थिएटरनंतर आता ओटीटीवर गाजणार 'सिंघम अगेन'; कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? जाणून घ्या
Bhakti Aghavअजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाने थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत शानदार कामगिरी केली. आता हा चित्रपट ओटीटीला टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन ओटीटी रिलीज कधी आणि कुठे रिलीज होणार आहे हे जाणून घेऊयात.
IND U19 vs BAN U19, ACC U19 Asia Cup 2024 Final Scorecard: अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारतीय युवा संघ बांगलादेशसमोर नतमस्तक, बांगला टायगर्सने 59 धावांनी केला पराभव
Amol Moreबांगलादेश अंडर-19 संघासाठी रिजान हुसेनने 65 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मोहम्मद शिहाब जेम्सनेही 67 चेंडूत 40 धावा केल्या. याशिवाय फरीद हसनने 49 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली, जी संघाची एकूण धावसंख्या 198 पर्यंत नेण्यात उपयुक्त ठरली.
Haryana Murder Case: धक्कादायक! हरियाणामधील कुरुक्षेत्रमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या; एक गंभीर जखमी
Bhakti Aghavमृतांमध्ये पती, पत्नी, त्यांचा मुलगा आणि सून यांचा समावेश आहे. वृद्ध दाम्पत्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. घटनेच्या वेळी सर्वजण आपापल्या खोलीत झोपले होते. सकाळी घरातील एकही सदस्य घराबाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
Rishabh Pant Pranks Adam Gilchrist: ऋषभ पंतचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल, महान ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत केला प्रँक
Amol Moreॲडलेड कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 175 धावांवर आटोपला होता. त्यानंतर डावाच्या ब्रेकच्या वेळी ऋषभ पंत मागून आला आणि त्याने गिलख्रिस्टचे डोळे आपल्या हातांनी झाकले. समालोचकही या मजेशीर घटनेचा भरपूर आनंद घेताना दिसले.
SA vs SL 2nd Test 2024 Day 4 Scorecard: दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 317 वर संपुष्टात, श्रीलंकेसमोर 347 धावांचे आव्हान
Amol Moreदक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्यांच्या फलंदाजांनी संघर्ष केला आणि चांगली कामगिरी केली. रायन रिकेल्टनने शानदार 101 धावा केल्या, तर काइल वॉरनने 105 धावांची नाबाद खेळी केली. वीरेनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय टेंबा बावुमाने 78 धावा केल्या, जे संघासाठी महत्त्वाचे योगदान होते.
Businessman Shot Dead in Delhi: ओळख चुकल्याने हत्या? व्यवसायिक सुनील जैन गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलीसांना संशय; घटनेला वेगळे वळण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDelhi Crime News: दिल्लीतील शाहदरा येथे 57 वर्षीय व्यापारी सुनील जैन याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केल्याचा संशय असल्याने पोलीस वेगळ्या दृष्टीकोणातून तपास करत आहेत.
Eknath shinde: 'हे सामान्य जनतेचे सरकार, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही', लातूरच्या 103 शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसांवर एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
Jyoti Kadamलातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे.
England Beat New Zealand, 2nd Test Day 3 Full Highlights: इंग्लंडने 15 वर्षांनंतर रचला इतिहास, न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव करून जिंकली मालिका; येथे NZ विरुद्ध ENG सामन्याचे हायलाइट पहा
Amol Moreदुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने 82.3 षटकात 427 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 582 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या नऊच्या धावसंख्येवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
IND WTC Final 2025 Qualification Scenario: ॲडलेडमधील पराभवनंतर टीम इंडियाचा डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग कठीण, जाणून घ्या अजूनही कसे ठरू शकतात पात्र
Nitin KurheIND vs AUS: डब्ल्यूटीसीच्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. कांगारू संघानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. जिथे ऑस्ट्रेलियाला 60.71 टक्के गुण आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 59.26 टक्के गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचे आता 57.29 टक्के गुण आहेत.
Maharashtra Samajwadi Party BJP's 'B Team': महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष म्हणजे भाजपची 'बी टीम'; Aaditya Thackeray यांची अबू आजमी यांच्यावर टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा भाजपची 'बी टीम' म्हणून काम करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे, ज्यामुळे महा विकास आघाडीतील तणाव वाढला आहे. शिवसेना (यूबीटी) नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर अबू आझमी यांनी सपाच्या बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.
IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेडमधील पराभवानंतर रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या पुनरागमनावर दिले मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाला
Amol Moreॲडलेडमध्ये भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 180 रन्सवर ऑलआऊट झाली होती. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावा आणि मार्नस लॅबुशेनच्या 64 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या.
AUS Beat IND 2nd Test 2024 Day 3 Full Highlights: ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव, ऑस्ट्रेलियाचा 10 गडी राखून विजय; येथे पाहा व्हिडिओ हायलाइट
Nitin KurheIND vs AUS: ऑस्ट्रेलियासमोर चौथ्या डावात केवळ 19 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये प्रत्येकी एक बरोबरीत आली आहे. याआधी पर्थ कसोटीत भारताने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला होता.
Tear Gas On Farmers Shambhu Border: पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, संभू सीमेवर तणाव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएमएसपी (MSP) हमी, कृषी कर्ज माफी आणि लखीमपूर खेरी पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी दिल्लीच्या दिशेने मोर्चा पुन्हा सुरू करताना आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवर अश्रूधुराच्या गोळ्यांचा सामना करावा लागला.
Maharashtra Road Accident: कंटेनर ट्रेलरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात; हॉटेलसमोर पार्क केलेला वाहनावर आदळला कंटेनर, एकाचा मृत्यू (See Pics and Video)
Jyoti Kadamमहाराष्ट्रातील खोपोली येथे भीषण रस्ते अपघात झाला. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील फूड कोर्टमध्ये कंटेनर ट्रेलरने नियंत्रण गमावल्याने अनेक वाहने चिरडली गेली. यात एकाचा मृत्यू झाला.
Indian Student Shot Dead in Canada: धक्कादायक! सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या
Bhakti Aghavकॅनडातील एडमंटनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब राज्यातील हर्षनदीप सिंग (Harshandeep Singh) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
Rajsamand Road Accident: खासगी बसमधून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 3 ठार, 24 हून अधिक जखमी
Jyoti Kadamशाळकरी मुलांना घेऊन रणकपूरकडे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.