ठळक बातम्या

Corruption Cases: राज्यात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेल्या 173 अधिकाऱ्यांचे अद्याप निलंबन नाही; ACB च्या अहवालातून समोर आली माहिती

Prashant Joshi

निलंबीत न झालेले सर्वाधिक अधिकारी हे मुंबई परिक्षेत्रातील असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 21 सरकारी विभागातील 173 अधिकारी असे होते, ज्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.

Maharashtra Lottery Result: आकर्षक पुष्कराज, महा.गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या आकर्षक पुष्कराज लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.

Los Angeles Fire: लॉस एंजेलिसच्या जंगलात नवीन आग; आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 1100 इमारती नष्ट, राज्यात आणीबाणी घोषित

Prashant Joshi

या भागातील ही आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आग असल्याचे बोलले जात आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने आता भीषण रूप धारण केले आहे. ही आग लॉस एंजेलिस आणि आता हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. ही भाषण आग पाहता राज्यात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे.

Tennis Ball Cricket Premier League 2025: युवराज सिंग बनला टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; आठ शहरांमधील संघांचा समावेश

Jyoti Kadam

टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगने जाहीर केलेल्या टी 10 टेनिस बॉल लीगच्या पहिल्या आवृत्तीत आठ भारतीय शहरांमधील संघ सहभागी होतील. दुबईमध्ये होणाऱ्या या लीगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला बनवण्यात आले आहे.

Advertisement

Mumbai College Student Booked: महाविद्यालयीन तरुण अंगावर पडला, मुलीचा मृत्यू; मुंबई येथील घटना, गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी हर्षद गौरव याच्यावर निष्काळजीपणामुळे जुहू येथे दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

India's First Mobile Washroom For Women: मुंबईतील कांदिवली येथे सुरु झाले महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह; जाणून घ्या उपलब्ध सुविधा

Prashant Joshi

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते. हा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.

Melbourne Stars vs Sydney Sixers BBL 2025 Live Streaming: मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 28 वा सामना आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 जिंकले आणि 4 हरले आहेत.

Pune: पीसीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताने महाराष्ट्राच्या दोन-मुलांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याने गमवावी लागली नोकरी

Prashant Joshi

दांगट यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 2021 मध्ये चौकशी समितीसमोर आवश्यक पुरावे सादर केले होते. ते म्हणतात, त्यानंतर आता 4 वर्षांनंतर, मी या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत असताना संस्थेने माझी सेवा समाप्त केली आहे. मी या आदेशाविरोधात योग्य प्राधिकरणाकडे न्याय मागणार आहे.

Advertisement

Tiruchirapalli, Tamil Nadu: वैकुंठ एकादशी सणानिमित्त भगवान नामपेरुमल यांच्या यात्रेत भाविकांनी केली गर्दी, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

वैकुंठ एकादशी सणानिमित्त मोहिनी अलंकारम येथील पागल पाथुच्या दहाव्या दिवशी भगवान नामपेरुमल यांंची यात्रा निघते, दरम्यान, यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक मंदिराला भेट देतात.

Nashik Police: हॉटेलमधून चोरीस गेलेल्या 3.5 कोटी रुपयांच्या वस्तूंचा नाशिक पलिसांकडून छडा, तक्रारदारास मुद्देमाल परत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पोलीस स्थापना दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून मुद्देमाल परत कार्यक्रमदरम्यान नाशिक पोलिसांनी चोरीस रोख रक्कम, सोने, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू तक्रारदारास 2.8 कोटी रुपये परत केल्या.

IND vs ENG T20I Series 2025: टीम इंडिया-इंग्लंडमधील टी 20 मालिका होणार धमाकेदार; हेड टू हेड रेकॉर्डची आकडेवारी घ्या जाणून

Jyoti Kadam

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील टी 20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

Tirupati Stampede Update: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देणार घटनास्थळास भेट

Shreya Varke

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी एक जण तामिळनाडूतील सालेम येथील रहिवासी आहे.

Advertisement

Weather Podcast Today: दिल्ली, मुंबई, यूपी, एमपी आणि बिहारसह देशभरात कसे असेल आजचे हवामान, जाणुन घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Shreya Varke

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) उद्याचा म्हणजेच ९ जानेवारीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत वायव्य आणि मध्य भारततसेच महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते.

Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 09 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, गुरुवार 09 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

AB PM-JAY Senior Citizen Scheme अंतर्गत 5 लाखांची मदत नाकारल्याने कॅन्सरग्रस्त 72 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करत संपवलं जीवन

Dipali Nevarekar

AB PM-JAY ज्येष्ठ नागरिक योजना मध्ये 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण दिले जाते.

India vs England, ODI Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी असू शकते टीम इंडिया! 'या' प्रतिभावान खेळाडूंना मिळू शकते संधी

Nitin Kurhe

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

Advertisement

IPL 2025: आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला आठवला 'हिटमॅन', शेअर केला रोहित शर्मासाठी 'हा' व्हिडिओ

Nitin Kurhe

आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी फक्त दोन महिने उरले आहेत. जगातील या सर्वात मोठ्या लीगची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आपला माजी कर्णधार रोहित शर्माच्या आठवणीत एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

IND vs ENG T20I And ODI Series Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून खेळवली जाणार टी-20 आणि वनडे मालिका, नोट करुन घ्या सामन्याची तारीख आणि वेळ

Nitin Kurhe

भारतीय संघ वर्षातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ब्लॉकबस्टर सामने पाहायला मिळणार आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. इंग्लंडचा संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे.

Stampede At Tirupati: तिरूपती मंदिरा मध्ये चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू; Vaikunthadwara Sarvadarshanam टोकन देताना झाला गोंधळ

Dipali Nevarekar

Tirupati Ruya Hospital मध्ये काही जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.

Pritish Nandy Passes Away: पत्रकार, फिल्ममेकर प्रीतीश नंदी यांचे निधन; अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केली दु:खद बातमी

Dipali Nevarekar

प्रितीश नंदी यांचे निधन मुंबई मध्ये कार्डिएक अरेस्ट ने झाले आहे. ते 73 वर्षांचे होते.

Advertisement
Advertisement