Pritish Nandy Passes Away: पत्रकार, फिल्ममेकर प्रीतीश नंदी यांचे निधन; अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केली दु:खद बातमी

प्रितीश नंदी यांचे निधन मुंबई मध्ये कार्डिएक अरेस्ट ने झाले आहे. ते 73 वर्षांचे होते.

Pritish Nandy | X @Anupam Kher

फिल्ममेकर, पत्रकार, माजी राज्यसभा खासदार प्रितीश नंदी यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार प्रितीश नंदी यांचे निधन कार्डिएक अरेस्ट ने झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. दरम्यान राज्यसभेत त्यांनी शिवसेनेकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते. ते कवी, फिल्ममेकर देखील होते.  इंग्रजीत सुमारे 40 कवितांची पुस्तके लिहिली आणि बंगाली, उर्दू आणि पंजाबीमधून इंग्रजीत कविता अनुवादित केल्या. त्यांनी ईशा उपनिषदाची नवीन इंग्रजी आवृत्तीही तयार केली.  The Times of India चे ते प्रकाशन संचालक देखील होते. अभिनेते अनुपम खेर यांनी दु:खद बातमी शेअर करताना भावूक पोस्ट देखील लिहली आहे.

प्रितीश नंदी यांचे निधन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement