ठळक बातम्या

IND vs ENG 2nd T20I 2025 Match Winner Prediction: दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया घेणार मालिकेत मजबूत आघाडी की इंग्लंड करणार पुनरागमन? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

Gaza Ceasefire Deal: कैद्यांच्या देवाणघेवाणीचा भाग म्हणून हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका (Watch Video)

Jyoti Kadam

हमासने युद्धविराम कराराचा भाग म्हणून चार महिला इस्रायली सैनिकांची सुटका केली आहे. त्यांना गाझा शहरातील पॅलेस्टाईन चौकातील रेड क्रॉस अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे. त्या बदल्यात, इस्रायल त्यांच्या तुरुंगातून 200 पॅलेस्टाईन लोकांना मुक्त करणार आहे.

Google Map Mislead: गुगल मॅपने फ्रेंच पर्यटकांना भरकटवलं, नेपाळलाजाताना बरेलीत अडकला; पोलिसांच्या मदतीने मार्ग बदलला

Jyoti Kadam

फ्रेंच पर्यटक गुगल मॅप्सच्या मदतीने नेपाळला जात होते. ते बरेलीमध्ये रस्ता चुकले आणि धरणाजवळ पोहोचले. नंतर पोलिसांच्या मदतीने त्यांनी पुढे मार्ग बदलला.

Kerala: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका

Shreya Varke

काँग्रेसचे आमदार आय.सी. बालकृष्णन यांना वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारीएन.एम. विजयन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे आमदार आय.सी. बालकृष्णन यांना शनिवारी अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या चौकशीनंतर बालकृष्णन यांच्या अटकेची नोंद करण्यात आली, परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

Advertisement

Jammu and Kashmir Beat Mumbai: रोहित शर्माच्या पुनरागमन सामन्यात मुंबईचा दारुण पराभव, जम्मू-काश्मीरचा पाच विकेट राखुन विजय

Nitin Kurhe

जम्मू-काश्मीरने मुंबईचा पाच विकेट्सने पराभव केला. शार्दुल ठाकूरच्या शतकाच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. जम्मू-काश्मीर संघाने पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

Visakhapatnam ला जाणाऱ्या Air India च्या विमानात तांत्रिक समस्या; Kempegowda International Airport परतले विमान

Bhakti Aghav

विमानतळ अधिकाऱ्यांनी कोणतेही आपत्कालीन लँडिंग नसल्याचे स्पष्ट करत सांगितले की, तांत्रिक समस्येमुळे विमान परतले, परंतु आपत्कालीन लँडिंग झाले नाही.

ICC Men's T20I Team of Year for 2024: आयसीसीने 2024 चा सर्वोत्तम टी-20 संघ केला जाहीर, फक्त 4 भारतीय खेळाडूंना मिळाले स्थान, कोहली बाहेर

Nitin Kurhe

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. 2024 हे वर्ष रोहितसाठी खूप छान होते. रोहितने टी-20 विश्वचषकात तीन अर्धशतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात त्याने 92 धावांची शानदार खेळी केली.

Sharad Pawar यांना खोकल्यामुळे बोलण्यास त्रास; 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द

Dipali Nevarekar

कार्यक्रमात सहभागी होऊन बोलता येऊ शकणार नाही त्यामुळे शरद पवारांनी पुढील 4 दिवसांचे सारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

Advertisement

Rangoli Designs for Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त घरासमोर, अंगणात किंवा शाळेच्या प्रागंणात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी डिझाइन (Watch Video)

Bhakti Aghav

आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रजासत्ताक दिन रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढून प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण आणखी खास पद्धतीने साजरा करू शकता.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Guillain-Barre Syndrome: पुण्यात 73 जणांना गिलेन-बॅरे सिंड्रोमची लागण, जाणून घ्या जीवघेण्या मज्जातंतू रोगाबद्दल सर्व काही

Shreya Varke

पुण्यातील ७३ जणांना होणारा गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक धोकादायक न्यूरोलॉजिकल आजार असून तज्ज्ञांनी त्याला जीवघेणा म्हटले आहे. जीबीएस सहसा बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शननंतर उद्भवते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून मज्जातंतूवर हल्ला करते, ज्यामुळे अशक्तपणा, अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यूदेखील होऊ शकतो. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात जीबीएसचे एकूण 73 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे.

Satyanarayan Puja Invitation Card In Marathi: माघ महिन्यात करण्यात येणाऱ्या सत्यनारायण महापूजेसाठी Messages, Images द्वारे आप्तेष्टांना द्या आग्रहाचे निमंत्रण!

टीम लेटेस्टली

तुम्ही देखील तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करण्याचे ठरवले असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे Messages, Images शेअर करून तुमच्या मित्र-परिवाला तसेच आप्तेष्टांना महापूजेसाठी आग्रहाचे निमंत्रण देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Advertisement

ICC Women's T20I Team of the Year 2024: आईसीसी महिला टी20 संघ ऑफ द इयर जाहीर, स्मृती मानधनासह 3 भारतीयांचा समावेश; लॉरा वोल्वार्डची कर्णधार म्हणून निवड

Jyoti Kadam

आयसीसीने अखेर 2024 च्या आयसीसी महिला टी20 संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटपटू लॉरा वोल्वार्ड्ट हिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.

Viral Video: समुद्राच्या खोलीत महाकाय बेलुगा व्हेलला व्यक्तीने केले किस, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

इंटरनेटच्या या जमान्यात कोण कधी सोशल मीडियावर कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. इंटरनेटवर दररोज हजारो व्हिडिओ पाहायला मिळतात, जे युजर्सचे मनोरंजन करतात आणि थराराने भरलेले असतात, पण त्यातील मोजकेच लोकांची मने जिंकू शकतात. या एपिसोडमध्ये एक असा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तुमची नजर हटवू शकणार नाही.

Long Covid Risk In Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांना दीर्घकाळ कोविड होण्याचा धोका 31 टक्क्यांनी जास्त; अभ्यासात खुलासा

Bhakti Aghav

दीर्घ कोविड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 रुग्णांना आजारातून बरे झाल्यानंतर आठवडे, महिने किंवा वर्षांनीही लक्षणे जाणवत राहतात. एवढेच नाही तर, साथीतून बरे झाल्यानंतरही वर्षानुवर्षे ही समस्या मेंदू, फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांसारख्या अनेक अवयवांना नुकसान पोहोचवू शकते.

जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून आज पहिल्यांदा धावली वंदे भारत (Watch Video)

Dipali Nevarekar

श्री माता वैष्णो देवी रेल्वे स्थानक, कटरा ते बडगाम या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची वन वे चाचणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

Advertisement

AUS W vs ENG W 3rd T20 2025 Live Toss & Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला संघाने टॉस जिंकला, इंग्लंड प्रथम गोलंदाजी करणार; येथे पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

तिसऱ्या टी-20 मध्ये, ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ताहलिया मॅकग्रा हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे इंग्लंड प्रथम गोलंदाजी करेल.

Satara Hit and Run Case: सातारा मध्ये भरधाव वेगात कारने 5 जणांना उडवले; एकाचा मृत्यू

Dipali Nevarekar

सातारा मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने 5 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे.

Lagos कडून अमेरिकेला निघालेल्या United Airlines विमानात हवेतच हेलकावले; 6 जण जखमी

Dipali Nevarekar

विमान कंपनीने सांगितले की, Flight 613 ने लागोसमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले आणि विमानातील सहा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Pune Road Accident: पुण्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Shreya Varke

पुण्यात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास बाहेरील महामार्गावरील वडगाव पुलाजवळ स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमी युवकांना आधी नवले रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व तरुण वाढदिवसाच्या पार्टीतून परतत होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement