ठळक बातम्या

India’s Got Latent Controversy: अश्लील सामग्री प्रकरण, 'इंडियाज गॉट लेटेंट' YouTube कार्यक्रम कायद्याच्या कचाट्यात; काय घडले आतापर्यंत? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अश्लीलता आणि अनुचित टिप्पण्यांचा आरोप असलेल्या तक्रारीनंतर मुंबई आणि असम पोलिसांनी वादग्रस्त यूट्यूब शो 'इंडियाज गॉट लेटेंट' ची चौकशी सुरू केली आहे. तपशील घ्या जाणून.

Unnatural Sex and Court's Verdict: पत्नीच्या परवानगीशिवाय अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

टीम लेटेस्टली

पत्नीच्या संमतीशिवायही पुरुषाने पत्नीसोबत केलेले अनैसर्गिक कृत्य हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी एका आदेशात ही टिप्पणी केली आणि आरोपी पतीची भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३७६ आणि ३७७ अन्वये सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आणि त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी न्यायालयाने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता आणि सोमवारी (१० फेब्रुवारी) निकाल दिला होता.

Terror Threat To PM Narendra Modi's Aircraft: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर होणार दहशतवादी हल्ला? मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, एक व्यक्तीला अटक

Prashant Joshi

कॉलनंतर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Guillain-Barré Syndrome: गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे मुंबईमध्ये पहिला मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 8 वर

Prashant Joshi

मुंबईमध्ये या आजाराने मृत्यू झालेली व्यक्ती ही वडाळा येथील रहिवासी होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या या रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु अखेर या आजाराने त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

GBS Death in Mumbai: गुईलेन-बॅरे सिंड्रोमचा मुंबईत पहिला बळी; नायर रुग्णालयात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Jyoti Kadam

गुईलेन-बॅरे सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) संक्रमित होऊन मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण व्हेंटीलेटरवर होता.

PAK vs SA 3rd ODI Tri-Series 2025 Live Streaming: पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेता संघ पोहोचणार अंतिम फेरीत; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

Mahakumbh Magh Purnima 2025: माघी पौर्णिमेच्या विशेष प्रसंगी भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

माघी पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर भाविकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. या शुभमुहूर्तावर लाखो भाविक गंगेत स्नान करण्यासाठी आले आहेत. माघी पौर्णिमेनिमित्त हेलिकॉप्टरमधून गंगेत स्नान करणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. देशभरात माघ पौर्णिमेचा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करत आहेत.

Sri Lanka vs Australia 1st ODI 2025 Toss Update: टॉस जिंकून श्रीलंकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन येथे पहा

Jyoti Kadam

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

Sri Lanka vs Australia 1st ODI 2025 Live Streaming: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. श्रीलंकेचे नेतृत्व चारिथ अस्लंका करत आहे.

Acharya Satyendra Das Dies: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन; ब्रेन स्ट्रोकनंतर लखनऊच्या रुग्णालयात चालू होते उपचार

टीम लेटेस्टली

आचार्य सत्येंद्र दास हे खूप शिक्षित होते. 1975 मध्ये आचार्य सत्येंद्र दास यांनी संस्कृत विद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर, पुढच्या वर्षी म्हणजे 1976 मध्ये, त्यांना अयोध्येच्या संस्कृत महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. मार्च 1992 मध्ये, तत्कालीन रिसीव्हरने त्यांना पुजारी म्हणून नियुक्त केले.

Accidents Due to Stray Dogs: कुत्रा आडवा आला, पोलीस मेव्हणा जागीच ठार झाला, एक जण गंभीर जखमी; सांगली येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भटक्या कुत्रे आडवे आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील मिरज शहरात मेहुण्यासोबत दुचाकीवरुन निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडली.

Instagram Teen Accounts in India: मेटा भारतामध्ये लाँच करणार 'इंस्टाग्राम टीन अकाउंट्स' फिचर; पालक ठेऊ शकणार मुलांच्या खात्यावर लक्ष, जाणून घ्या फीचर्स

Prashant Joshi

इन्स्टाग्राम टीन अकाउंट पालकांच्या मुलांच्याबद्दल असलेल्या अनेक चिंता कमी करण्याचे काम करेल. जसे की, मुले ऑनलाइन कोणाशी संवाद साधतात, ते कोणत्या प्रकारच्या कंटेंटच्या संपर्कात येतात, ते इंटरनेट प्लॅटफॉर्मवर त्यांचा वेळ कसा व्यतीत करतात, अशा अनेक बाबी पालकांना समजू शकणार आहेत.

Advertisement

Hug Day 2025 Date: हग डेनिमित्त आलिंगन, मिठी ही प्रेमातली सर्वात सुंदर भावना करा व्यक्त, येथे पाहा, या विशेष दिवसाचे महत्व

Shreya Varke

आलिंगन, मिठी हि प्रेमातली सर्वात सुंदर भावना आहे. मिठी मारणे हा आपुलकीचा एक भाग आहे. 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हग डे हा व्हॅलेंटाइन वीकमधील सर्वात प्रतिक्षित दिवसांपैकी एक आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक जोडपे उत्सुक असतात. हा दिवस प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप खास असतो. हग डे च्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ येणे, एकमेकांचा उबदार स्पर्श अनुभवणे हि भावना प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या 12 फेब्रुवारी रोजी हग डे साजरा केला जातो.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, मिचेल स्टार्कची स्पर्धेतून माघार

Jyoti Kadam

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. कारण, मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्टार्कच्या बाहेर पडल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

Shri Thanedar Highlights Key Issues: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी श्री ठाणेदार यांचे महत्त्वाचे भाष्य, वाचा सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर श्री ठाणेदार यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. काय म्हणाले ठाणेदार, वाचा सविस्तर

IND vs ENG 3rd ODI 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना फ्री डिशवर थेट प्रक्षेपण उपलब्ध होईल का? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवर सामना कसा प्रसारित करायचा ते जाणून घ्या

टीम लेटेस्टली

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित केली जाईल. याशिवाय, डिस्ने+ हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

Advertisement

Indias Got Latent Controversy: महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कारवाई; अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याबाबत 30 ते 40 जणांविरुद्ध दाखल केला एफआयआर

Prashant Joshi

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मंगळवारी युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या वादग्रस्त टिप्पणीशी संबंधित अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली 30 ते 40 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. महाराष्ट्र सायबर पोलिसांचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली होती.

Jasprit Bumrah Ruled Out of ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाला मोठा धक्का! पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; 'या' तरुण खेळाडूला मिळाली संधी

Jyoti Kadam

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताच्या गोलंदाजीचा कणा मोडला आहे. कारण, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबद्दल माहिती दिली.

Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 12 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, बुधवार 12 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages: शब-ए-बारातनिमित्त WhatsApp Wishes, GIF Greetings आणि Photo SMS च्या माध्यमातून पाठवा खास शुभेच्छा संदेश

Shreya Varke

शब-ए-बारात हा इस्लामी कॅलेंडरच्या आठव्या महिन्यातील शाबानच्या 14 व्या आणि 15 व्या रात्री दरम्यान साजरा केला जाणारा एक महत्वाचा मुस्लिम सण आहे. प्रत्येक मुस्लिम समुदायासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा सण रमजान सुरु होण्याची पंधरा दिवसापूर्वी येतो. शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम बांधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात. यंदा शब-ए-बारात चा सण 13 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.

Advertisement
Advertisement