Terror Threat To PM Narendra Modi's Aircraft: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर होणार दहशतवादी हल्ला? मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, एक व्यक्तीला अटक
कॉलनंतर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ज्या व्यक्तीने हा कॉल केला होता त्याला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, 'मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो मानसिक आजारी आहे’.
या कॉलनंतर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान मोदी सोमवारी फ्रान्स आणि अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा बुधवारपासून सुरू होणार आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका असल्याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर एक धमकी पाठवण्यात आली होती, ज्यात दोन कथित आयएसआय एजंट्सचा समावेश असलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटाचा दावा करण्यात आला होता. (हेही वाचा: Shri Thanedar Highlights Key Issues: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी श्री ठाणेदार यांचे महत्त्वाचे भाष्य, वाचा सविस्तर)
Terror Threat To PM Narendra Modi's Aircraft:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)