Acharya Satyendra Das Dies: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन; ब्रेन स्ट्रोकनंतर लखनऊच्या रुग्णालयात चालू होते उपचार
आचार्य सत्येंद्र दास हे खूप शिक्षित होते. 1975 मध्ये आचार्य सत्येंद्र दास यांनी संस्कृत विद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर, पुढच्या वर्षी म्हणजे 1976 मध्ये, त्यांना अयोध्येच्या संस्कृत महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. मार्च 1992 मध्ये, तत्कालीन रिसीव्हरने त्यांना पुजारी म्हणून नियुक्त केले.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना 3 फेब्रुवारीपासून लखनऊच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 87 वर्षीय सत्येंद्र दास गेल्या 34 वर्षांपासून रामलल्लाची सेवा करत होते. तात्पुरत्या तंबूपासून ते भव्य मंदिरात प्रतिष्ठापना होईपर्यंत ते रामलल्लाचे सेवक म्हणून काम करत राहिले. काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआयच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता. आज, बुधवारी त्यांचे निधन झाल्याची रुग्णालयाने याची पुष्टी केली. सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल राम मंदिर ट्रस्टने तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे रामनगरीच्या मठ-मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे.
आचार्य सत्येंद्र दास हे खूप शिक्षित होते. 1975 मध्ये आचार्य सत्येंद्र दास यांनी संस्कृत विद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर, पुढच्या वर्षी म्हणजे 1976 मध्ये, त्यांना अयोध्येच्या संस्कृत महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. मार्च 1992 मध्ये, तत्कालीन रिसीव्हरने त्यांना पुजारी म्हणून नियुक्त केले. (हेही वाचा: Veteran Writer R. R. Borade Passes Away: ‘पाचोळा’कार ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांचे निधन; मराठी साहित्यविश्वाने गमावला प्रतिभासंपन्न लेखक)
Acharya Satyendra Das Dies:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)