ठळक बातम्या
Aarey Milk Colony Ghost Story: गोरेगाव आरे कॉलनीत आत्मा, गोरेगाव आरे कॉलनीत भूत आहे का? जाणून घ्या पांढऱ्या साडीतील महिलेची भीतीदायक सत्यता
Shreya Varkeआरे मिल्क कॉलनी हा सुंदर परिसर असून एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आवडते ठिकाण आहे. मात्र, जसजसा सूर्य मावळतो आणि अंधार पडतो, तसतशी एक वेगळीच कहाणी समोर येते. रात्रीच्या वेळी आरे मिल्क कॉलनी रस्त्यापासून दूर राहण्याचा सल्ला स्थानिक लोक देतात,खरच गोरेगाव आरे मिल्क कॉलनीत भूत आहे का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. आरे मिल्क कॉलनी दिवसा गुन्हेगारी आणि बिबट्या दिसण्याचा धोका असला तरी, सूर्यास्तानंतर या परिसरात घडणाऱ्या अलौकिक घटनांबद्दल रहिवाशांना अधिक चिंता असते
Jamui Communal Violence: बिहारमध्ये धार्मिक वादावरून दोन गटात हाणामारी, प्रशासनाकडून कारवाईत इंटरनेट सेवा बंद; पोलिसांचा फौजफाटा तैनात (Video)
Jyoti Kadamजमुईमध्ये दोन पक्षांमध्ये दंगल झाली आहे. या गोंधळात नगर परिषदेचे उपमुख्य नगरसेवक जखमी झाले. परिस्थिती लक्षात घेता, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
SC On Places Of Worship Case: 'पुरे झाले आता'; प्रार्थनास्थळांच्या बाबतीत दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
Bhakti Aghavन्यायालयाने अतिरिक्त कारणांसह हस्तक्षेप याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. तसेच आतापर्यंत दाखल केलेल्या नवीन याचिकांवर नोटीस जारी करण्यास नकार दिला आहे.
Ranji Trophy 2024-25 Semifinal: गुजरात-केरळ रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीला प्रेक्षकांची पाठ; फक्त पाच हजर, जेवणापूर्वी संख्या एकवर
Jyoti Kadamथंडी संपत आल्यामुळे दिवसा कडक उन नागरिकांना सहन कराव लागत आहे. त्याचा फटका मुळे, रणजी ट्रॉफी 2024-25 च्या आजच्या सामन्याला मिळाला. कारण, संपूर्ण स्टेडीयम रिकाम होत.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग शिफारशींमध्ये कशाचा समावेश असेल? 7th पे कमीशनमधील HRA आणि Dearness Allowance बद्दल घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग लागू झाल्यास घडभाडे आणि महागाई भत्ता किती असेल? याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. दरम्यान, सातव्या वेतन आयोगात या तरतुदी कशा होत्या? याबाबत घ्या जाणून.
Rat Found in Chocolate Shake: ऑनलाइन मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये आढळले मृत उंदीर, कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल
Shreya Varkeकॅफेतून ऑनलाइन चॉकलेट शेकमध्ये मृत उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना पुणे येथे घडली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी फूड अॅपवरून चॉकलेट शेक मागवल्याची माहिती समोर आली आहे. पण चॉकलेट शेक पिताना तरुणीला धक्काच बसला. चॉकलेट शेकमध्ये तरुणीला एक मृत उंदीर दिसला. या घटनेनंतर ती प्रचंड संतापले आणि तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि ती उपचारासाठी रुग्णालयात गेला. पुण्यातील लोहगाव येथे ही घटना घडली आहे.
Shakira Hospitalised: पोटदुखीमुळे शकीरा रुग्णालयात दाखल, पेरूमधील कॉन्सर्ट रद्द
Shreya Varkeपॉप गायिका शकीरा हिने पोटदुखीच्या तक्रारीनंतर पेरूमधील आपला कार्यक्रम नुकताच रद्द केला आहे. लास मुजेरेस किंवा नो लॉरेन वर्ल्ड टूरदरम्यान तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शालिराने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मला तुम्हा सर्वांना सांगताना खेद होत आहे की, पोटाच्या समस्येमुळे मला काल रात्री रुग्णालयात जावे लागले आणि मी सध्या रुग्णालयात दाखल आहे.
Jhansi: एकाच ऑटो-रिक्षात 19 प्रवाशांची वाहतूक; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून वाहन जप्त (Watch Video)
Jyoti Kadamझाशीमध्ये पैशांच्या हव्यासापोटी ऑटो-रिक्षा चालकांच्या मनमानीचे एक प्रकरण समोर आली आहे. ज्यात 19 प्रवासी प्रवास करताना आढळले. कायद्याचे उल्लंघन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चालकावर कारवाई केली.
Samay Raina ला मोठा झटका! महाराष्ट्र सायबर सेलने व्हिडिओ कॉलवरून जबाब नोंदवण्यास दिला नकार
Bhakti Aghavमहाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber Cell) ने रैनाला त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वैयक्तिकरित्या हजर राहण्यास सांगितले आहे.
Andheri Railway Station Video: अंधेरी स्टेशनवर थरार, 'मैं मौत को छूकर टक से वापस आ गया'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Local Viral Video: मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक आठवर एक तरुण धावती ट्रेन पकडण्याच्या नादात फलाट आणि ट्रेनच्या मोकळ्या जागेत पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू होण्याचाच संभव होता. मात्र, आरपीएफ जवानामुळे त्याचे प्राण वाचले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kurla Shocker: मुंबई शहर हादरले! कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार; दोन अल्पवयीन मुलांना घेण्यात आले ताब्यात
Bhakti Aghavपीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही आरोपी मुलांनी अल्पवयीन मुलीला कुर्ला येथील एका ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
Accident Caught on Camera in Hyderabad: सूर्यपेट रोड येथे 'मद्यधुंद' कार चालकाची 8 दुचाकींना धडक; 3 जण जखमी
Jyoti Kadamहैदराबादमधील सूर्यपेट रोडवर एका मद्यधुंद कार चालकाने आठ दुचाकींना धडक दिली. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले. हा धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे
Prateik Babbar’s Wedding: प्रतीक बब्बरने कुटुंबियांच्या अनुपस्थितीत केले लग्न, वडील आणि बहिणीच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधान
Shreya Varkeव्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अभिनेता प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांनी एका खासगी समारंभात लग्न केले आहे. मात्र, प्रतीकचे वडील राज बब्बर आणि सावत्र बहीण आर्य बब्बर आणि जुही बब्बर यांच्या अनुपस्थितीमुळे अफवांना उधाण आले आहे. कुटुंबात सुरु असलेल्या तणावाची बरीच चर्चा समोर येत आहेत. या अफवांवर प्रिया बॅनर्जी यांनी आता मौन सोडले आहे.
Mysuru Shocker: म्हैसूरमध्ये अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्य आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे गूढ अद्याप अस्पष्ट
Bhakti Aghavम्हैसूरमधील विश्वेश्वरैया नगर येथे ही घटना घडली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. चेतन (वय,45), त्याची पत्नी रूपाली (43), त्यांचा मुलगा कुशल (15) आणि चेतनची आई प्रियंवदा (62) अशी त्यांची नावे आहेत.
‘Chhaava’ Box Office Collection Day 3: विकी कौशलचा 'छावा'ची दमदार कमाई, भारतात 3 दिवसांत 110 कोटींचा व्यवसाय
Jyoti Kadamलक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणादायी कहाणी मोठ्या पडद्यावर जिवंत करतो.
Earthquake Safety And Emergency Response: भूकंप काळात स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण कसे करावे? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEarthquake Safety Tips: भूकंप झाला तर घाबरु नका, स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा टिप्स जाणून घ्या. भूकंपाच्या घटनांपूर्वी, दरम्यान आणि नंतर सुरक्षित राहण्यासाठी तज्ञांनी शिफारस केलेल्या खबरदारीचे पालन करा.
IPL 2025 Tickets Booking: आयपीएल पाहण्यासाठी तिकिटे कधी, कुठे आणि कशी मिळतील? किंमत, पूर्व-नोंदणी, ऑनलाइन बुकिंगची संपूर्ण माहिती इथे पहा
Jyoti Kadamस्टेडियममधून आयपीएलचे सामने पाहण्यासाठी चाहते तिकिटे बुक करण्यास उत्सुक आहेत. तथापि, बीसीसीआयने अद्याप अधिकृत बुकिंग प्रक्रिया जाहीर केलेली नाही.
Delhi Chief Minister's Swearing-in Ceremony: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 20 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता
Bhakti Aghavबुधवारी, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तसेच गुरुवारी, 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली मुख्यमंत्र्यांचा मोठा शपथविधी समारंभ होईल. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर होणार आहे.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.