Andheri Railway Station Video: अंधेरी स्टेशनवर थरार, 'मैं मौत को छूकर टक से वापस आ गया'

Mumbai Local Viral Video: मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक आठवर एक तरुण धावती ट्रेन पकडण्याच्या नादात फलाट आणि ट्रेनच्या मोकळ्या जागेत पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू होण्याचाच संभव होता. मात्र, आरपीएफ जवानामुळे त्याचे प्राण वाचले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Andheri Railway Station Video | (Photo Credit- X)

Mumbai Viral Video: रस्ते प्रवासात 'अती घाई संकटात नेई', 'मनावरील ब्रेक उत्तम ब्रेक' अशी घोषवाक्ये लिहीलेले फलक आणि मुंबई शहरातील कोणत्याही रेल्वे स्टेशनवरुन लोकल पकडताना 'पायदान आणि फलाटावरील अंतराकडे लक्ष द्या', 'धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु नका, असे करणे जीवावर बेतू शकते', अशा घोषणा पावलोपावली ऐकालयला मिळतात. पण, ऐकणार कोण? जो तो आपापल्या नादात, प्रत्येकालाच पुढे पुढे धावण्याची आणि लोकल पकडून जाण्याची घाई. ही घाई किती जीवावर बेतू शकते, हे 100% भीषणतेने दाखवणारी घटना अंधेरी रेल्वे स्टेशन (Andheri Railway Station) फलाटावर घडली आहे. या घटनेमध्ये एक तरुण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला आहे. हे केवळ फलाटावर उपस्थित असलेल्या आरपीएफ (RPF) म्हणजेच रेल्वे रुरक्षा दलाच्या (Railway Protection Force) जवानामुळे घडले आहे. ही घटना फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

तरुणाकडून घडल अक्षम्य चूक

मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशन, शहरातील कोणत्याही गर्दी आणि रहदारीच्या ठिकाणांप्रमाणेच एक. दररोज हजारो प्रवासी ये जा करतात. ट्रेनमध्ये चढतात आणि उतरतात. शिस्तबद्ध हालचाल करणारे यांत्रिक मानव भासावेत असे स्वत:ला मुंबईकर म्हणवून घेणारे हे जीव नियमीत वेळेत येतात आणि जातात. क्वचितच त्यात बदल होतो. एखादा नवी जीव आल्यावर मात्र त्याला या व्यवस्थेशी जुळवून घेणे अतिशय कष्टप्रद होते आणि महाचुक घडते. कधी कधी नियमीत प्रवाशाकडूनही अशी महाचुक होऊ शकते. अशीच महाचुक एका तरुणाने अंधेरी रेल्वे स्टेशनवर केली. फलाटावरुन ट्रेन सुटली. धावती ट्रेन पकडणे चूकच. पण, ही अक्ष्यम चूक या तरुणाने केली. त्याला काळ, वेळ आणि चपळता याचे गणित बांधता आले नाही. परिणामी ते गणीत चुकले आणि हा तरुण काली कोसळला. थेट फलाट आणि धावत्या ट्रेनच्या मधल्या पोकळीत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या या धक्कादायक, अंगावर शहारे आणणारी अशी घटना. कोणत्याही सामान्य माणूस गर्भगळीत होऊन जाईल अशी. पण, प्रशिक्षीत आरपीएफ जवान जवळच असल्याने 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याची प्रचिती घडली. (हेही वाच, ST Bus Accident CCTV Footage: धावत्या MSRTC एसटी बसचे चाक निखळले, 30 प्रवाशी थोडक्यात बचावले; वज्रेश्वरी-वसई मार्गावरील घटना)

आरपीएफ जवानामुळे वाचले प्राण

अंधेरी रेल्वे स्थानक फलाटावर कर्तव्य बजावत असलेला आरपीएएफ जवान दक्ष होता. हा तरुण काहीतरी गडबड करणार हे बहुदा त्याच्या अनुभवी नजरेने हेरलेच होते. त्यामुळे तो नकळतपणे सावधच होता. आणि घडलेही तसेच. या तरुणाने धावती ट्रेन पकडली. वर उल्लेख केल्याप्रमाणे तो हात सुटुन खाली कोसळला. काहीच क्षणांमध्ये तो रेल्वेच्या चाखाखाली येणार आणि संभाव्यत: त्याचा रेल्वेच्या चाकांखाली आल्याने चिन्नविच्छीने झालेला मृतदेह पाहायला मिळणार अशी स्थिती. पण, आरपीएफ जवानाने चपळता दाखवली. तो वायुवेगाने पुढे धावला आणि त्याने त्या तरुणाला मागे खेचला. इतक्यात एक महिला पोलिसही घटनास्थळी धावली तिनेही या जवानास मदत केली आणि सदर तरुणाचा जीव वाचला. व्हिडिओत पाहायला मिळते की, अवघ्या काहीच सेकंदामध्ये घडलेली ही घटना. काळजाचा थरकाप उडवणारी. पण, घाबराघुबरा झालेला हा तरुण सुरक्षीतपणे बाहेर निघतो. स्वत:च्या पायावर उभा राहतो. त्याला पाहून सर्वांकडूनच सुटकेचा निश्वास टाकला जातो.

काळजाचा ठोका चुवणारा 'हाच' तो क्षण

एक्स (जुने ट्विटर) नावाच्या सोशल मीडिया मंचावर @HansrajMeena नावाच्या हँडलवर आज (17 फेब्रुवारी) दुपारी 12.13 वाजता शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत चार हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी पाहिला आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना अंधेरी रेल्वे स्थानकावर शक्ती एक्सप्रेस फलाट क्रमांक-8 सोडत असताना घडला. या घटनेत पीडित तरुण हा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, या तरुणाला रेल्वे प्रशानाने समुपदेशन आणि आवश्यक उपचार करुन अरावली गाडीने अहमदाबाद येथे पाठवले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now