Jhansi: एकाच ऑटो-रिक्षात 19 प्रवाशांची वाहतूक; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून वाहन जप्त (Watch Video)

झाशीमध्ये पैशांच्या हव्यासापोटी ऑटो-रिक्षा चालकांच्या मनमानीचे एक प्रकरण समोर आली आहे. ज्यात 19 प्रवासी प्रवास करताना आढळले. कायद्याचे उल्लंघन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चालकावर कारवाई केली.

Photo Credit- X

Jhansi: गाव-खेड्यात ऑटो-रिक्षा चालकांच्या मनमानीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पैशांच्या हव्यासापोटी रिक्षात अधिक प्रवाशांची वाहतूक, जास्त भाडे आकारणे या गोष्टी आता सऱ्हास पहायला मिळतात. त्यातच ताजी घटना उत्तर प्रदेशातील झाशीमधून समोर आली आहे. एका ऑटोरिक्षा चालकाला 19 प्रवाशांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडण्यात आले. ही घटना 15 फेब्रुवारी 2025 च्या रात्री बरुआसागर पोलिस स्टेशनने नियमित पोलिस तपासणी दरम्यान घडली. ऑटोरिक्षा 19 प्रवाशांनी भरलेली असल्याचे त्यांना आढळून आले तेव्हा पोलिसही थक्क झाले. प्रवाशांचा आकडा हा अधिकृत मर्यादेपेक्षा (traffic rules) खूपच जास्त होता. हा संपूर्ण भाग व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.व्हिडिओमध्ये, प्रवासी एकामागून एक वाहनातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना संख्या मोजण्यासाठी रांगेत उभे राहण्याचे आदेश दिले. सर्वांना आश्चर्य वाटले की, ऑटोमध्ये खरोखरच 19 प्रवासी होते. कारवाई करत पोलिसांनी वाहन जप्त केले आहे.

एकाच ऑटो-रिक्षात 19 प्रवाशांची वाहतूक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now