ठळक बातम्या
Viral Video: मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी पत्नी आणि मुलांना ठेवले डांबून, पोलिसांनी केली सुटका
Shreya Varkeलखनऊच्या रजनीखंड परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रामसागर यादव याने पत्नी आणि मुलांना घरात बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी कुटुंबियांना डांबून ठेवल्याचे समोर आले होते.
Shani Shingnapur Temple: शनि शिंगणापूरमध्ये आजपासून शनिदेवाच्या शिळेवर अर्पण करण्यात येणार ब्रँडेड तेल; काय आहे यामागचे कारण? जाणून घ्या
Bhakti Aghavशनिदेवाच्या शिळेचे रक्षण करण्यासाठी, मंदिर ट्रस्टने ब्रँडेड तेल अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँडेड तेल म्हणजे असे तेल जे सरकारने मान्यता दिलेले खाद्यतेल किंवा ज्या तेलाच्या बाटलीवर त्यात असलेल्या सर्व घटकांची माहिती तेलाच्या लिहिलेली असते.
IND vs NZ Champions Trophy 2025 Pitch Report: दुबईमध्ये रंगणार भारत आणि न्यूझीलंड सामना, खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज कोण करणार कहर? वाचा पिच रिपोर्ट
Nitin Kurheएकीकडे लाहोरमध्ये धावांचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे दुबईमध्ये फलंदाजांना खूप अडचणी येत आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना जिंकणारा संघ ग्रुप अ मध्ये प्रथम स्थान मिळवेल. भारत-न्यूझीलंड सामन्यात खेळपट्टीची स्थिती कशी असेल जाणून घेवूया..
Sukma Encounter: छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 2 नक्षलवादी ठार
Bhakti Aghav, जंगलाच्या मध्यभागी नक्षलवाद्यांना सैन्याने घेरले. नक्षलवाद्यांच्या मोठ्या जमावाची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली.
SA vs ENG 11th Match Live Toss Update: दक्षिण आफ्रिकेसाठी 'करो या मरो' सामना, इंग्लंडने टाॅस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheदक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक स्पर्धा होईल. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे. तर, इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरकडे आहे.
IND vs NZ Champions Trophy 2025: मोठ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल आले अपडेट, न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग 11 चा भाग असेल का नाही? घ्या जाणून
Nitin Kurheटीम इंडिया त्यांच्या अनेक खेळाडूंच्या खराब फिटनेसमुळे त्रस्त दिसत होती. आता लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा फिटनेस अपडेट समोर आला आहे. रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम 11 संघात असेल की नाही हे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra: वाशिममध्ये बर्ड फ्लूचा कहर, 6000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Shreya Varkeविदर्भात बर्ड फ्लूचा कहर वाढल्यामुळे कारंजा तालुक्यातील खेर्डा येथील पोल्ट्री फार्ममध्ये आठ हजार कोंबड्यांपैकी सहा हजार कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यानंतर पुण्यातील नॅशनल हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज इन्स्टिट्यूट आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेतही नमुन्यांची सविस्तर तपासणी करण्यात आली. 27 फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या अहवालात मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे.
Goa: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत लेखक उदय भेंबरेने केलेल्या वक्तव्यावरून वाद, माफी मागण्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शने
Shreya Varkeछत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोकणी लेखक उदय भेंबरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी लेखकाच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. लेखकाने माफी मागावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. मात्र, लेखकाने अद्याप केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही.
SA vs ENG Champions Trophy 11th Match Live Streaming: इंग्लंड दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीचे स्वप्न करणार का भंग? कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना? वाचा येथे
Nitin Kurheदक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक स्पर्धा होईल. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे. तर, इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरकडे आहे.
HC On Sexual Assault Complaint: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महिलेने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असेल असं नाही; केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Bhakti Aghavमाजी महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखालील एका पुरूषाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांनी ही टिप्पणी केली.
Girl Kidnapped With Lure of Chocolate: पालघरमधील वाडा तालुक्यात चॉकलेटचे आमिष दाखवून 8 वर्षांच्या मुलीचे अपहरण; पोलिसांनी 48 तासांत केली सुटका
Bhakti Aghavसंजय गांधी नगर येथून अपहरण केलेल्या आठ वर्षांच्या मुलीची सामाजिक गटांच्या मदतीने पोलिसांनी 48 तासांत यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. आरोपी, इतिहासलेखक डेव्हिड उर्फ गुरुनाथ मुकणे असे याने मुलीचे अपहरण करण्यापूर्वी तिला चॉकलेटचे आमिष दाखवले होते.
Navi Mumbai Crime: विवाहबाह्य संबंधातून मुलाच्या मदतीने पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या, नवी मुंबई येथील घटना
Shreya Varkeनवी मुंबईत विवाहवाह्य संबधातून एका माजी पोलीसाला हाताशी धरुन एका पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळलेल्या पत्नीने मुलाला हाताशी धरुन पतीला झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून त्याची हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईतील उलवे इथं घडली आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर असलेला माजी पोलीस कर्मचारी, एक रिक्षा चालक आणि आरोपी महिलेचा अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
Man Suicide Due to Stock Market Loses: शेअर बाजारात 16 लाख रुपयांचे नुकसान; नाशिकमधील 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Bhakti Aghavपोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, राजेंद्र आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ होता ज्यामुळे त्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.
Ramadan 2025 Date in India: भारतात रमजानचा पवित्र महिना 2 मार्चपासून होणार सुरु, लखनऊच्या शाही इमामांची घोषणा
Shreya Varkeरमजानचा पवित्र महिना 2 मार्च 2025, रविवारपासून सुरू होणार आहे. जामा मशीद प्रशासन आणि लखनऊच्या शाही इमामांनी ही घोषणा केली. दुसरीकडे, सौदी अरेबियामध्ये 28 फेब्रुवारी रोजी चंद्र दिसला, म्हणजेच 1 मार्च 2025 रोजी तेथे रमजान सुरू होईल. रमजान मध्ये इस्लामी कॅलेंडरच्या नवव्या महिन्याची सुरुवात होते आणि पहाट ते सूर्यास्तादरम्यान 29 ते 30 दिवसांच्या उपवासाचा कालावधी सुरू होतो. रमजान 2025 चा चंद्र 28 फेब्रुवारी 2025 रोजी जगातील काही भागात दिसण्याची शक्यता होती
Uttarakhand Avalanche Update: माना हिमस्खलन घटनास्थळावरून 46 कामगारांना वाचवण्यात यश; काहींची प्रकृती चिंताजनक
Bhakti Aghavखराब हवामान असूनही रात्रभर लष्कराच्या अथक प्रयत्नांनंतर हे बचाव कार्य पार पाडण्यात आले. सुटका केलेल्या लोकांना ताबडतोब माना आर्मी कॅम्पमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले.
LPG Price Hike: आजपासून गॅस सिलेंडर महागला; तुमच्या शहरात किती आहे किंमत? जाणून घ्या
Bhakti Aghavतेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर 6 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर, दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1803 रुपयांना विकला जात आहे.
Rangareddy Fire Tragedy: तेलंगणातील रंगारेड्डी भागात किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 3 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी
Shreya Varkeतेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील पुप्पलगुडा पाशा कॉलनीत शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात आगीत तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मणिकोंडा नगरपालिकेच्या हद्दीत हि घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
Weather Forecast Today: देशात कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Shreya Varkeराज्यात उष्णतेच्या झळा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अधिक तापमान राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात तापमानात 1-2 अंशांनी वाढणार आहे. 1 मार्च रोजी मुंबई आणि अहमदाबाद येथे अनुक्रमे 28.4 आणि 31.3 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. शुक्रवारी राज्यात मुंबईत 38.4 अंश सेल्सियस तापामानाची सर्वााधिक नोंद झाली.
Maharashtra Govt Transfers IPS Officers: 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कोणती जबाबदारी मिळाली? जाणून घ्या
Bhakti Aghavराज्य गृह विभागाच्या आदेशानुसार गुप्ता यांना एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर मेखला यांना एडीजी (आर्थिक गुन्हे शाखा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 1 मार्च 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 1 मार्च 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.