HC On Sexual Assault Complaint: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महिलेने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असेल असं नाही; केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण

माजी महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखालील एका पुरूषाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांनी ही टिप्पणी केली.

Kerala High Court | (File Image)

HC On Sexual Assault Complaint: लैंगिक गुन्ह्यांसह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, तक्रारदार महिलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असणे आवश्यक नाही. कारण आजकाल अशा प्रकरणांमध्ये निष्पाप लोकांना गोवण्याची प्रवृत्ती वाढली आहे, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. माजी महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखालील एका पुरूषाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांनी ही टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या सुरुवातीच्या तक्रारीची चौकशी केली नाही. आरोपीने महिलेला तिचे कर्तव्य योग्यरित्या न बजावल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकले, त्यानंतर महिलेने आरोपीला शिवीगाळ केली आणि धमकी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement