NZ vs SL 2nd Test: ट्रेंट बोल्ट याने इतिहास रचला, टेस्टमध्ये 'ही' कामगिरी करणारा बनला न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज
ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंड क्रिकेट संघ (New Zelaand Cricket Team) सध्या श्रीलंका (Sri Lanka) दौर्‍यावर आहे. कोलंबोच्या पी सारा ओव्हल मैदानावर दोन्ही संघांमधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील दुसरा सामना खेळाला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि कुसल परेरा (Kusal Perera) यांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. या दोघांच्या विकेटसह बोल्टच्या नावावर टेस्ट कारकिर्दीत एका खास कामगिरीची भर पडली आहे. मॅथ्यूची विकेट बोल्टच्या कारकिर्दीतील 250 वी टेस्ट विकेट होती, तर परेराची विकेट 251 वी होती. अशा प्रकारे, त्याच्या खात्यात 250 किंवा त्याहून अधिक टेस्ट विकेट्स जमा झाले आहेत. न्यूझीलंड क्रिकेटसाठी अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसरा किवी गोलंदाज ठरला आहे. (SL vs NZ 2019: श्रीलंकाविरुद्ध टी-20 साठी टिम साऊथी करणार न्यूझीलंडचे नेतृत्व; केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट यांना डच्चू)

बोल्टच्या आधी रिचर्ड हेडली (Richard Headly) आणि डॅनियल व्हेटोरी (Daniel Vettori) हे दोन गोलंदाज आहेत आणि त्यांच्या खात्यात 250 हून अधिक विकेट्स जमा आहेत. हेडलीने 86 सामन्यांत 431 विकेट्स, तर व्हेटोरीने 112 सामन्यात 361 टेस्ट विकेट घेतल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बोल्टने 63 व्या कसोटीत 250 विकेट्सचा टप्पा ओलांडला. या सामन्यात टीम साऊथी (Tim Southee) याने दोन गडी बाद केले असून सध्या त्याच्या खात्यात 247 विकेट्स आहेत.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे बराच खेळ खराब केला होता आणि केवळ 36.3 षटकांचा सामना झाला. विकेटच्या बाबतीत बोल्ट आणि साऊथीमध्ये जास्त फरक नाही आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की बोल्ट आता न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज बनला आहे,ज्याने 250 टेस्ट विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे.