फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा 38 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज  (Chennai Suepr Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. चेन्नई सुपर किंग संघ अंतिम क्षणापर्यंत काही पराभव स्वीकार करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याचे ताजे उदाहरण म्हणजे फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis). केकेआर (KKR) डावात झेल पकडताना गुडघा रक्तबंबाळ होऊनही डु प्लेसिस संघासाठी मैदानावर राहिला. इतकंच नाही तर तो दुसऱ्या डावात फलंदाजीला देखील मैदानात उतरला. क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनतर सामन्यादरम्यान, CSK च्या फाफ डु प्लेसिसने एक उत्तम झेल घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्याचा ‘सुपरफाफ’ म्हणून उल्लेख करत आहेत. (IPL 2021, CSK vs KKR: रोमहर्षक सामन्यात कोलकाता 2 विकेटने पराभूत; धोनी ब्रिगेडची विजयी एक्सप्रेस सुसाट, Ravindra Jadeja ठरला गेमचेंजर)

जोश हेजलवुड कोलकाताच्या डावातील 10 व्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषा ओलांडेल असे वाटत होते, परंतु सीमारेषेवर उभ्या असलेल्या डू प्लेसिसने तसे होऊ दिले नाही. आणि त्याने हवेत सूर मारून अप्रतिम झेल घेतला. याच दरम्यान फाफच्या गुडघा दुखापतग्रस्त झाल्याचे नेटकऱ्यांच्या लक्षात आले. डु प्लेसिसच्या गुडघ्यावरील रक्त पाहून चाहते भावूक झाले. हे फोटो लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांनी डु प्लेसिसच्या चेन्नईसाठी समर्पणाचे कौतुक केले. मात्र, त्याच्या गुडघ्यातून रक्तस्त्राव कधी सुरू झाला हे अद्याप समजले नाही. व्यंकटेश अय्यरने शॉट रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला दुखापत झाली असेल असे म्हटले जात आहे.

दुखापतग्रस्त फाफने घेतला मॉर्गनचा जबराट कॅच

डु प्लेसिसच्या गुडघ्यातुन रक्तस्त्राव

समर्पण!

फॅफचा जबरा कॅच...

जखमी झाला आणि परतला

फाफ डु प्लेसिसची काळजी घ्या

डू प्लेसिस एक चांगला क्षेत्ररक्षक आहे पण चेन्नईमध्ये त्याची मोठी भूमिका डावाची सुरुवात करणे आहे. आयपीएलच्या या टप्प्यात तो काही विशेष करू शकला नसला तरी तरीही चेन्नईने या स्टार खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. तसेच डु प्लेसिसने शानदार झेल घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेक वेळा थक्क करणारे झेल घेतले आहेत. क्षेत्ररक्षण व्यतिरिक्त डु प्लेसिस फलंदाजीमध्येही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने 10 सामन्यांमध्ये 50.14 च्या सरासरीने 351 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत आहे.