IND vs ENG 2nd Test Live: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला (IND vs ENg 2nd Test) आजपासून सुरूवात झाली आहे. भारतीय संघ सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने पहिल्या दिवशी सहा विकेट गमावून 336 धावा केल्या आहे. यशस्वी जैस्वाल 179 धावांवर नाबाद असून रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद आहे. तत्तपुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित-गिल-श्रेयस अय्यर हे पुन्हा फ्लाप ठरले त्यांनी आपल्या स्वस्तात विकेट गमावल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)