आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघाला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडची कमान अनुभवी अष्टपैलू मिचेल सँटनरच्या हाती आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध भारताने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत: शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
Captain @hardikpandya7 wins the toss and elects to bowl first in the 1st T20 against New Zealand.
A look at our Playing XI for the game ??
Live - https://t.co/9Nlw3mU634 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/fNd9v9FTZz
— BCCI (@BCCI) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)