क्रिकेटर Mohammed Siraj करतोय Mahira Sharma ला डेट? सोशल मीडीयात एका फोटोवरून चर्चांना सुरूवात

माहिराच्या या ब्लॅकलेस ड्रेस च्या फोटोला 7 लाख 37 हजाराहून अधिक लाईक्स आतापर्यंत मिळाले आहेत.

क्रिकेटर Mohammed Siraj करतोय Mahira Sharma ला डेट? सोशल मीडीयात एका फोटोवरून चर्चांना सुरूवात
Mahira Sharma and Siraj | Instgaram

क्रिकेटर Mohammed Siraj ने अभिनेत्री Mahira Sharma च्या इंस्टाग्राम वरील एका फोटोला लाईक केल्यानंतर आता त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडीयात सुरू झाल्या आहे. काहींना हे केवळ सामान्य इंटरअ‍ॅक्शन वाटत आहे तर काहींनी या एका लाईक वर थेट त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू केल्या आहेत. दरम्यान माहिरा शर्मा ही बिग बॉस 13 ची हिंदी पर्वाची सदस्य होती. या शो पासून ती बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी माहिरा ने इंस्टाग्राम वर एक काळ्या ब्लॅक लेस ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. यावर मोहम्मद सिराज ने लाईक केले आहे. मोहम्मद सिराज आणि माहिरा कधी एकत्र स्पॉट झालेले नाहीत त्यामुळे या एका लाईक्स मुळे अनेक नेटकरी त्याच्यामध्ये काय स्पेशल फिलिंग आहे का? अशी चर्चा करत आहेत. माहिराच्या या ब्लॅकलेस ड्रेस च्या फोटोला 7 लाख 37 हजाराहून अधिक लाईक्स आतापर्यंत मिळाले आहेत.

माहिरा शर्मा यापूर्वी पारस छाब्रा सोबत डेट करत होती. दोघे बिग बॉस 13 च्या घरात भेटले होते तेथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र 2023 मध्ये ते वेगळे झाले. माहिराने त्यानंतर पारसला इंस्टाग्राम वर देखील फॉलो करणं सोडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Sharma (@mahirasharma)

मोहम्मद सिराज हा टीम इंडिया मध्ये फास्ट बॉलर आहे. IPL 2025 mega auction मध्ये सिराजला गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. आता तो गुजरातच्या टीम सोबत खेळताना दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2024 01:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).