आज मंत्रालयात सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 'आजादी का अमृत महोत्सव' राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाची संकल्पना, मा.राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, विविध समित्यांचे गठन, सुरुवात व आतापर्यंतची वाटचाल, या उपक्रमांतर्गत निधी तरतूद, विविध विभागांकडून प्राप्त प्रस्ताव व प्रस्तावित निधी नियोजन, विविध विभागांचे प्रस्तावित प्रकल्प यावर चर्चा झाली. यावेळी मंत्री राजेश टोपे, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री आदित्य ठाकरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत निधी तरतूद, विविध विभागांकडून प्राप्त प्रस्ताव व प्रस्तावित निधी नियोजन, विविध विभागांचे प्रस्तावित प्रकल्प यावर चर्चा झाली. यावेळी मंत्री @rajeshtope11 जी, मंत्री @AdvYashomatiINC जी, मंत्री @AUThackeray जी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 2/2 pic.twitter.com/QmCRGzTh44
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)